तुम्हाला महिना 1 लाख रुपये पगार हवा असेल तर 'या' जागांसाठी अर्ज करा, संपूर्ण माहिती एका क्लिकवर
सरकारी नोकऱ्यांना वेगळे महत्त्व आहे. त्यांची सुरक्षा, पगार आणि भत्ते यामुळं तरुणांची सरकारी नोकऱ्यांना पसंती आहे. सरकारी नोकरीसाठी विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
Government Jobs With Good Salary : आजही सरकारी नोकऱ्यांना वेगळे महत्त्व आहे. त्यांची सुरक्षा, पगार आणि भत्ते हे काही घटक त्यांना तरुणांची पहिली पसंती देतात. कालानुरूप तरुणांच्या आवडीमध्ये बदल झाला असला तरी अजूनही चांगल्या सरकारी नोकरीची तुलना होत नाही. सध्या ज्या संस्थांची पगार रचना अतिशय चांगली आहे अशा अनेक संस्थांमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. निवड झाल्यावर, पगार सुमारे 1 लाख रुपये असेल किंवा त्याहून अधिक.
चांगल्या पगाराच्या नोकऱ्यांची यादी
करन्सी नोट प्रेस, नाशिक – करन्सी नोट प्रेस, नाशिक येथे 117 वेगवेगळ्या पदांसाठी भरती सुरू आहे. निवड झाल्यानंतर, अनेक पदांचे वेतन जास्तीत जास्त 95 हजार रुपयांपर्यंत आहे.
AIIMS भोपाळ - येथे अनेक नॉन-फॅकल्टी पदांसाठी भरती सुरू आहे. 357 पदांपैकी अनेकांचे वेतन महिन्याला एक लाख रुपयांपर्यंत आहे.
AIIMS गोरखपूर – येथे 142 विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अनेकांचा पगार महिन्याला जास्तीत जास्त एक लाख तर काहींचा पगार दोन ते तीन लाख रुपयांपर्यंत जातो.
BEML - BEML, जे पूर्वी भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड म्हणून ओळखले जात होते, त्यांनी कार्यकारी पदासाठी भरती जाहीर केली आहे. श्रेणीनुसार कमाल वेतन 1 लाख ते 3 लाख रुपये आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया - 192 पदांसाठी भरती सुरु आहे. अनेक पदांवर निवड केल्यास पगार एक लाख रुपयांपेक्षा जास्त असतो. माहिती तंत्रज्ञान, जोखीम व्यवस्थापक, आर्थिक विश्लेषक, कायदा अधिकारी, क्रेडिट अधिकारी, सुरक्षा अधिकारी, ग्रंथपाल इत्यादी पदे आहेत.
कॅबिनेट सचिवालय भरती - येथे 125 पदांसाठी भरती सुरू आहे. शेवटची तारीख उद्या म्हणजेच 6 नोव्हेंबर आहे. अर्जाची फी शून्य आहे म्हणजेच कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. निवड केल्यास दरमहा सुमारे 90 हजार रुपये वेतन मिळते.
GIMS भर्ती – शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेने स्टाफ नर्सच्या 255 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. शेवटची तारीख 7 नोव्हेंबर आहे. या पदासाठी वेतन 44 हजार 900 रुपये ते 1 लाख 42 हजार 400 रुपये आहे.
HAL भर्ती - हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये अनेक पदांसाठी भरती सुरु आहे. एकूण 84 पदे भरली जातील. अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2023 आहे. निवडल्यास, वेतन पोस्टनुसार आहे आणि दरमहा 40 हजार ते 2 लाख 40 हजार रुपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या: