Banking Finance jobs : खुशखबर! बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती; तब्बल 2.50 लाख नोकऱ्या मिळणार, वाचा सविस्तर
Jobs in Banking & Finance Sector : बँकिंग-फायनान्स क्षेत्रात 2030 पर्यंत या क्षेत्रात तब्बल 2.50 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे.

Jobs in Banking & Finance Sector नवी दिल्ली : बँकिंग-फायनान्स क्षेत्रात नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक मोठी आणि आनंददायी बातमी समोर आली आहे. देशातील बँकिंग आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) क्षेत्रात मोठी वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान 2030 पर्यंत या क्षेत्रात तब्बल 2.50 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे, असे 'अडेको इंडिया' च्या ताज्या अहवालात म्हटले आहे. परिणामी, या क्षेत्रात पुढील वर्षी म्हणजेच 2025-2026 या काळात साधारण 8.7 टक्के आणि 2030 पर्यंत सुमारे 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ होणे अपेक्षित आहे.
दरम्यान, या नोकऱ्या केवळ मोठ्या महानगरांपुरत्या मर्यादित नसून, पुणे, जयपूर, अहमदाबाद, सुरत, इंदूर आणि लखनौसारख्या दुसऱ्या, तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये देखील निर्माण होत असून इथे 48 % नव्या नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. त्यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी हि मोठी पर्वणी ठरणार आहे.
नोकऱ्यांत वाढ होण्यामागील कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्यबाळाची आकडेवारी घटली असली तरी, ऑनलाइन बँकिंग, डिजिटल पेमेंट आणि सायबर सुरक्षा तज्ज्ञांची मागणी प्रचंड वाढली आहे. परिणामी या नोकऱ्यांमध्ये चांगले वेतन देखील मिळते आहे. ज्यामध्ये उमेदवारांना 10-15% अधिक पगार मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक भाषेचे ज्ञान आणि प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव असलेल्यांना नोकरीची शक्यता 2.5 पट जास्त असल्याचे बोललं जात आहे.
जवळजवळ एक दशकानंतर, देशांतर्गत दीर्घकालीन विकासाची गती वाढविण्यासाठी बँकिंग क्षेत्र (Banking sector) कसे वाढवायचे यावर अर्थ मंत्रालय आणि आरबीआय यांच्यात चर्चा सुरू आहे. यानंतर, भारतात लवकरच नवीन बँकांसाठी परवाने जारी केले जाणार आहेत. याबाबतची माहिती एका अहवालात देण्यात आली आहे. देशात दीर्घकालीन विकासाला चालना देण्यासाठी बँकिंग क्षेत्राचा विस्तार कसा करायचा याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे.
अहवालानुसार, येत्या काही दशकांमध्ये देशाच्या महत्त्वाकांक्षी विकास योजना पूर्ण करण्यासाठी सरकार आणि केंद्रीय बँकेत अनेक पावले उचलण्याची चर्चा आहे. त्यापैकी एक म्हणजे अधिकाधिक मजबूत बँकांसाठी मार्ग मोकळा करणे. यामध्ये, मोठ्या कंपन्यांना शेअर होल्डिंगवर बंदी घालून बँक परवान्यांसाठी अर्ज करण्याची परवानगी देण्याचा पर्याय देखील विचारात घेतला जात आहे. याशिवाय, नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना पूर्ण बँकिंग सेवांमध्ये रुपांतरित करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर चर्चा आहे. तसेच, परदेशी गुंतवणूकदारांसाठी सुविधांचा विचार केला जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
























