![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Job Majha : दूरसंचार विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे विविध पदांसाठी भरती
JOB Majha : महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग अकोला, दूरसंचार विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर
![Job Majha : दूरसंचार विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे विविध पदांसाठी भरती Job Majha Recruitment for various posts in Department of Telecom Mumbai Port Trust Job Majha : दूरसंचार विभाग, मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे विविध पदांसाठी भरती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/23/dbbb69a57edd67fb85891426efdf83ff1661249528445290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पालघर येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर
महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग अकोला
पोस्ट - प्राध्यापक सह प्राचार्य, प्राध्यापक सह उप-प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/वाचक, सहायक प्राध्यापक, शिक्षक / क्लिनिकल प्रशिक्षक
- शैक्षणिक पात्रता - नर्सिंगमध्ये मास्टर्स डिग्री
- एकूण जागा - 17
- नोकरीचं ठिकाण - अकोला
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - अध्यक्ष, प्रियदर्शनी ग्रामीण आणि आदिवासी उत्थान प्रतिष्ठान, महात्मा फुले इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग, अकोला गोरक्षण रोड, अकोला- 444004
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 16 सप्टेंबर 2022
इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक
पोस्ट - कल्याण अधिकारी, कनिष्ठ कार्यालय सहायक
- शैक्षणिक पात्रता - डिग्री/ डिप्लोमा, पदवीधर, इंग्रजी 40 आणि हिंदी 30 श.प्र.मि. टायपिंग
- एकूण जागा - 16
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
- तपशील - ispnasik.spmcil.com (या वेबसाईटवर गेल्यावर discover SPMCIL यात careers वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. view details करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
दूरसंचार विभाग, मुंबई
पोस्ट - सिनियर अकाऊंटंट, ज्युनियर अकाऊंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क
- शैक्षणिक पात्रता - कम्प्युटर, इंटरनेटचं ज्ञान आवश्यक आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
- एकूण जागा - 09
- नोकरीचं ठिकाण - मुंबई, गोवा, नागपूर, औरंगाबाद
- ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 31 ऑक्टोबर 2022
- तपशील - dot.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर vacancy मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
मुंबई पोर्ट ट्रस्ट
पोस्ट - वरिष्ठ उपवाहतूक व्यवस्थापक, उपमुख्य यांत्रिक अभियंता
- शैक्षणिक पात्रता - पदवीधर
- एकूण जागा - 06
- ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 ऑक्टोबर 2022
- तपशील - mumbaiport.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर media मध्ये vacancy वर क्लिक करा. advertisement वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीच्या लिंक दिसतील. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)