Job Majha : बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक येथे नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीबाबत सर्व माहिती
Job Majha :नोकरीची गरज असलेले तरुण बँक ऑफ इंडिया येथे नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. बँक ऑफ इंडिया येथे नोकरीच्या संधी आहेत.
बँक ऑफ इंडिया
विविध 696 रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे.
पहिली पोस्ट – ऑफिसर (regular)
शैक्षणिक पात्रता – अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी आणि चार वर्षांचा अनुभव किंवा CA / ICWA/CISA आणि तीन वर्षांचा अनुभव. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.
एकूण जागा – 594
वयोमर्यादा – 28 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022
तपशील - bankofindia.co.in
दुसरी पोस्ट - ऑफिसर (Contractual)
शैक्षणिक पात्रता - B.E./ B.Tech./ MCA, ७ ते ८ वर्षांचा अनुभव
एकूण जागा – 102
वयोमर्यादा – 28 ते 38 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मे 2022
तपशील - bankofindia.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. त्यात recruitment of officers in various streams upto scale IV on regular & contract basis या लिंकवर क्लिक करा. Advertisement वर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
पंजाब नॅशनल बँक
पोस्ट – मॅनेजर, सिनियर मॅनेजर
शैक्षणिक पात्रता - CA/CWA/CFA किंवा पदवीधर (विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.)
एकूण जागा – 145 (यात मॅनेजर पदासाठी 140 जागा आणि सिनियर मॅनेजर पदासाठी 5 जागा आहेत.)
वयोमर्यादा – 25 ते 35 वर्ष
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मे 2022
तपशील - www.pnbindia.in (या वेबसाईटवर गेल्यावर recruitments वर क्लिक करा. RECRUITMENT FOR 145 POSTS OF SPECIALIST OFFICERS या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)