एक्स्प्लोर

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ 14 तास होणार? आयटी कंपन्यांच्या प्रस्तावावर सरकार निर्णय घेणार

14 Hours Workday : कर्नाटकातील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास 14 तासांपर्यंत वाढवण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारला दिला आहे.

मुंबई : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आयटी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास 14 तासांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारला पाठवला आहे. या प्रस्तावावर कर्मचाऱ्यांकडून संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे.

कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ 14 तास होणार? 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे कामाचे तास 14 तासांपर्यंत वाढवण्याची मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारला सादर केला आहे.  या निर्णयाला कर्मचाऱ्यांकडून तीव्र विरोध करण्यात आला आहे. 14 तास काम करणे, अमानुष असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. अनेक कर्मचाऱ्यांनी आरोग्याच्या समस्या आणि नोकरकपातीचा मुद्दा उपस्थित करत याचा निषेध केला आहे. 

आयटी कंपन्यांच्या प्रस्वावावर सरकार निर्णय घेणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकार कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट, 1961 मध्ये सुधारणा करण्याचा विचार करत आहे. आयटी कंपन्यांना त्यांच्या प्रस्तावाचा दुरुस्तीमध्ये समावेश करायचा आहे, ज्यामुळे कायदेशीररित्या कामाचे तास 14 तासांपर्यंत वाढवले ​​जातील, यामध्ये 12 तास + 2 तास ओव्हरटाइम अशी शिफ्ट असेल. दरम्यान, सध्याच्या कामगार कायद्यानुसार, कामाची वेळ 12 तासांपर्यंत 10 तास + 2 तास ओव्हरटाइम, अशाप्रकारे वाढवण्याची  परवानगी आहे.

कामाची वेळ 14 तासांपर्यंत वाढवा, आयटी कंपन्यांची मागणी

आयटी सेक्टरने कामगार कायद्यासाठी पाठवलेल्या नवीन प्रस्तावात म्हटले आहे की, "IT/ITeS/BPO क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिवसातून 12 तासांपेक्षा जास्त आणि सतत तीन महिन्यांत 125 तासांपेक्षा जास्त काम करण्याची आवश्यकता असल्याने त्यासंदर्भात परवानगी दिली जाऊ शकते". याबाबत सरकारने प्राथमिक बैठक घेतली असून लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. या प्रस्तावावर मंत्रिमंडळात चर्चा होण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांकडून तीव्र निषेध

कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाला कर्नाटक राज्य आयटी आणि आयटीईएस एम्प्लॉईज युनियन (KITU) कडून जोरदार विरोध करण्यात आला आहे. युनियनने एक निवेदन जारी करत म्हटलं आहे की, कामाचे तास वाढवल्यास शिफ्टवर परिणाम होईल. कामगारांच्या शिफ्टची संख्या कमी झाल्यामुळे एक तृतीयांश कर्मचारी बेरोजगार होतील. यामुळे कंपन्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या तीन शिफ्ट प्रणालीऐवजी दोन शिफ्ट कराव्या लागली आणि यामुळे एक तृतीयांश कर्मचारी कामावरुन काढले जातील." असं निवेदनात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवकांसाठी मोठी बातमी, रेल्वेमध्ये 1 हजार 421 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी गुड न्यूज, देशातील 7 राज्यात 12 लाख नवीन नोकऱ्या मिळणार, महाराष्ट्रात किती?  
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?
महाराष्ट्रातील युवकांसाठी नोकरीची मोठी संधी! SBI मध्ये तब्बल 9 हजार 766 पदांसाठी भरती सुरु, कसा कुठे कराल अर्ज?

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget