(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HCL Recruitment 2022 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये दहावी आणि ITI पास तरुणांसाठी भरती; 1 जुलैपासून अर्ज करा
HCL Recruitment 2022 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) ने 10वी आणि ITI पास साठी शिकाऊ प्रशिक्षण पदासाठी अर्ज मागवले आहेत. तुम्ही कधी अर्ज करू शकता ते जाणून घ्या
HCL Recruitment 2022 : हिंदुस्तान कॉपर लिमिटेड (HCL) नं दहावी आणि ITI पास उमेदवारांसाठी शिकाऊ प्रशिक्षण पदासाठी अर्ज मागवले आहेत. हे प्रशिक्षण खेत्री कॉपर कॉम्प्लेक्स, हिंदुस्तान कॉपर लिमिटेड येथे शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत दिले जाईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 1 जुलै 2022 पासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 290 रिक्त पदं काढण्यात आली आहे. या भरतीसाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI देखील आवश्यक आहे. दरम्यान, मेट माइन्स आणि ब्लास्टर माइन्स ही अशी दोन कामं आहेत. ज्यासाठी कोणतीही तांत्रिक पात्रतेची अट घालण्यात आलेली नाही.
पदों की संख्या : 290
भरती प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 1 जुलै 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2022
- शॉर्टलिस्टेड कँडिडेट्सची लिस्ट जाहीर होण्याची तारीख : 10 ऑगस्ट 2022
भरती प्रक्रियेसंदर्भातील महत्त्वाची माहिती
- मेट (माइंस) : 60
- ब्लॉस्टर (माइंस) : 100
- डीजल मॅकेनिक : 10
- फिटर : 30
- टर्नर : 5
- वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक : 25
- इलेक्ट्रिशियन : 40
- इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक : 6
- ड्रॉफ्ट्समॅन सिविल : 2
- ड्रॉफ्ट्समॅन मैकेनिकल : 3
- कंप्यूटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट : 2
- सर्वेयर : 5
- रेफ्रीजेरेशन एवं एयर कंडिशनर : 2
निवड प्रक्रिया जाणून घ्या
ITI आणि दहावीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. आयटीआय स्कोअरला 30 टक्के वेटेज मिळेल. तर दहावीच्या गुणांना 70 टक्के व्हेटेज दिलं जाईल. ज्या पदांसाठी ITI ची मागणी नाही, दहावीच्या गुणांना निवडीत 100 टक्के व्हेटेज मिळेल.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.