Government Job : सरकारी नोकरी हवीय? 'या' पदांसाठी अर्ज करा, 1 लाख रुपयांपेक्षा अधिक पगार मिळवा
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही या जागांसाठी अर्ज करु शकता.
Government Job: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही उत्तराखंडमधील विविध रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता. ही भरती नर्सिंग ऑफिसरच्या पदासाठी होते आहे. निवड झाल्यावर तुम्हाला खूप चांगला पगार मिळणार आहे. उत्तराखंड वैद्यकीय सेवा निवड मंडळाने या भरतीसाठी नुकतीच जाहीरात प्रसिद्ध केली आहे. तुम्ही या पदांसाठी अर्ज करुन सरकारी नोकरी मिळवू शकता.
महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा
UKMSSB च्या या भरतीसाठी अर्ज 12 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 जानेवारी 2024 आहे. एवढेच नाही तर फी जमा करण्याची शेवटची तारीख देखील 1 जानेवारी 2024 आहे. या तारखेपूर्वी विहित नमुन्यात अर्ज करा.
रिक्त जागांचा तपशील
या भरती मोहिमेद्वारे एकूण 1455 पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये नर्सिंग ऑफिसर पुरुष म्हणजेच पुरुषांची 1163 पदे आहेत. नर्सिंग ऑफिसर महिलांसाठी 292 पदे रिक्त आहेत.
ही अधिकृत वेबसाइट
UKMSSB च्या नर्सिंग ऑफिसरच्या पदासाठीचे अर्ज फक्त ऑनलाइन असतील. नोंदणी लिंक उघडल्यानंतर, तुम्ही वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरू शकता. हे करण्यासाठी, उत्तराखंड वैद्यकीय सेवा निवड मंडळाच्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता आहे – ukmssb.org.
कोण अर्ज करू शकतो
अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे B.Sc नर्सिंग पदवी असणे आवश्यक आहे. 21 ते 42 वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पात्रतेशी संबंधित अधिक तपशील नोटिसमधून पाहिले जाऊ शकतात.
निवड कशी होईल?
या पदांवरील निवड परीक्षेशिवाय होईल. पदवी आणि डिप्लोमाच्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. यानंतर कागदपत्रांची पडताळणी होईल आणि शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल.
फी आणि पगार काय आहेत
अर्ज करण्यासाठी, सामान्य आणि ओबीसी श्रेणींसाठी 300 रुपये शुल्क भरावे लागेल. तर इतर श्रेणींसाठी 150 रुपये शुल्क आहे. निवड झाल्यावर, पगार स्तर 7 नुसार असेल. या अंतर्गत मासिक वेतन 44,900 ते 1,42,400 रुपये असेल.
महत्त्वाच्या बातम्या: