असिस्टंट प्रोफेसरसह अनेक पदांसाठी रिक्त जागा; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज
Dr. Bhimrao Ambedkar University Jobs 2022 : विद्यापीठाने सहाय्यक प्राध्यापकांसह अनेक पदांसाठी रिक्त जागा काढल्या आहेत. या भरतीसाठी उमेदवार 7 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.
Dr. Bhimrao Ambedkar University Jobs 2022 : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच. आग्रा, यूपी येथे असलेल्या डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठानं (Dr. B R Ambedkar University) नियमित प्राध्यापकांची रिक्त पदं भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. www.dbrau.org.in या अधिकृत साइटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार या पदांसाठी 7 जूनपर्यंत अर्ज करू शकतात.
रिक्त जागांचा तपशील
विद्यापीठ या भरतीद्वारे प्राध्यापकांच्या 12 पदं, सहयोगी प्राध्यापकाच्या 14 पदं आणि सहायक प्राध्यापकाच्या 25 पदांची भरती करणार आहे.
अर्ज शुल्क
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1500 रुपये ठेवण्यात आलं आहे. EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 1000 रुपये आहे आणि SC/ST उमेदवारांसाठी अर्जाची फी 500 रुपये आहे.
या दिवसापर्यंत अर्ज करा
डॉ. बी.आर. आंबेडकर विद्यापीठानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ही भरती मोहीम 5 मेपासून सुरू झाली आहे. ज्यासाठी इच्छुक उमेदवार 7 जून 2022 पर्यंत अर्ज करू शकतात. विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज केल्यानंतर, उमेदवारानं भरलेल्या अर्जाची प्रिंट घेऊन रजिस्ट्रारच्या नावाने 10 जूनपर्यंत नोंदणीकृत पोस्टाने निवासी युनिट कार्यालयात पाठवावी. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार अधिकृत साइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Indian Railway Recruitment 2022 : रेल्वेत नोकरीची संधी, 1033 पदांवर बंपर भरती
- Bank of India Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी, 594 पदांवर भरती
- PNB Recruitment 2022 : पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, आज अर्ज करण्याची शेवटची तारीख
- IOCL Recruitment 2022 : पदवीधरांसाठी महत्त्वाची बातमी; प्रति माह 50 हजार कमावण्याची संधी, कसा कराल अर्ज?