DGCA Recruitment 2022 : DGCA मध्ये कंसलटंट पदांवर भरती, येथे करा अर्ज
DGCA Vacancy 2022 : नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) कंसलटंट पदांवर 50 रिक्त जागांसठी भरती करण्यात येत आहे. यासाठी 18 ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
DGCA Recruitment 2022 : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कंसलटंट पदांवरील भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत कंसलटंट पदासाठीच्या 50 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे. अवघे काहीच दिवस शिल्लक असल्याने इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
भरतीचा तपशील
DGCAकडून या भरतीअंतर्गत कंसलटंट पदासाठीच्या 50 रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.
रिक्त पदांचा तपशील
- सल्लागार (धोकादायक वस्तूंचे निरीक्षक) : 3 पदं
- सल्लागार (उपसंचालक ऑपरेशन्स) : 1 पद
- सल्लागार (असिस्टंट डायरेक्टर ऑपरेशन्स) : 1 पद
- एरोड्रोम मानक सल्लागार : 14 पदं
- सल्लागार (सहाय्यक संचालक) : 2 पदं
- सल्लागार (कायदेशीर अधिकारी) : 2 पदं
- सल्लागार (उड्डाण पात्रता) : 27 पदं
महत्त्वाच्या तारखा
- ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाल्याची सुरुवात तारीख : 01 ऑगस्ट 2022
- ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2022
शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापिठातून सिव्हिल शाखेत पदवी शिक्षण पूर्ण केलेलं असावं.
वयोमर्यादा
या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराचं कमाल वय 63 वर्ष असावं, त्याहून अधिक नाही,
किती पगार मिळेल?
या भरती मोहिमेअंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना 55 हजार ते 75 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.
कशी असेल निवड प्रक्रिया?
या पदांवर उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा आणि कुठे करावा?
या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.dgca.gov.in वर जाऊन अर्ज डाउनलोड करू शकतात. यानंतर उमेदवाराने अंतिम तारखेपूर्वी फॉर्म भरून अधिसूचनेत दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडण्यास विसरू नका.