BARC Jobs 2022 : मुंबईत नोकरी शोधताय? मग इथे अप्लाय करा, अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
BARC Recruitment 2022 : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई येथे भरती जारी केली आहे. तुम्हीही मुंबईत नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी सोडू नका.
BARC Recruitment 2022 : भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबई यांनी स्टायपेंडरी ट्रेनी, वैज्ञानिक सहाय्यक आणि तंत्रज्ञ या पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत, स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I, स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-II, वैज्ञानिक सहाय्यक (सुरक्षा), तंत्रज्ञ (ग्रंथालय विज्ञान) आणि तंत्रज्ञ (रिगर) या पदांची भरती केली जाईल.
या भरतीच्या माध्यमातून 266 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. ज्यामध्ये स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-I च्या 71 पदं (UR-27, EWS-8, OBC- 18, SC-10, ST-7 आणि PWD-1) आणि स्टायपेंडरी ट्रेनी श्रेणी-2 च्या एकूण 189 पदांची भरती केली जाईल, यामध्ये UR साठी 118 पदं, EWS साठी 14, OBC साठी 33, SC साठी 23 आणि PWD साठी 1 पद निश्चित करण्यात आलं आहे.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 01 एप्रिल 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2022
या भरतीच्या स्टायपेंडियरी ट्रेनी श्रेणी-1 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित अभियांत्रिकीचा डिप्लोमा, स्टायपेंडियरी ट्रेनी श्रेणी-II साठी उमेदवार 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि A/c मेकॅनिकच्या ट्रेडमधील प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार भरतीशी संबंधित इतर माहितीसाठी जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट https://nrbapply.formflix.com ला भेट देऊ शकतात. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांना सूचित केलं जातं की, त्यांनी वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. दरम्यान, एका पदासाठी फक्त एकच अर्ज वैध असेल आणि जर एखाद्या उमेदवाराला एकापेक्षा जास्त पदांसाठी अर्ज करायचा असेल तर प्रत्येक पदासाठी अर्ज आणि शुल्क स्वतंत्रपणे भरावं लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Job opportunities in medical field : वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी
- SBI Recruitment 2022 : थेट मुलाखतीद्वारे मिळेल नोकरी, 63 वर्षांपर्यंतचे अर्ज करू शकतात, SBI ची नवीन अधिसूचना
- SC Recruitment 2022 : तुम्हाला विविध भाषांचे असेल ज्ञान, तर सर्वोच्च न्यायालयात मिळू शकते नोकरी, जाणून घ्या
- Railway Recruitment 2022 : 12वी आणि पदवीधर तरुणांसाठी सुवर्णसंधी! रेल्वेत नोकरी करायचीय? तर लवकर करा अर्ज