बँकांमध्ये नोकऱ्यांचा विक्रम, गेल्या 10 वर्षांचा रेकॉर्ड काढला मोडीत; खासगी बँका आघाडीवर
बँकिंग क्षेत्रात (Banking sector) नोकऱ्यांचा पूर आला आहे. व्यवसायात वाढ झाल्यामुळे केवळ सरकारीच नाही तर खासगी बँकांनीही भरपूर नोकऱ्या दिल्या आहेत.
Banks Job : बँकिंग क्षेत्रात (Banking sector) नोकऱ्यांचा पूर आला आहे. व्यवसायात वाढ झाल्यामुळे केवळ सरकारीच नाही तर खासगी बँकांनीही भरपूर नोकऱ्या दिल्या आहेत. हाच ट्रेंड भविष्यातही दिसेल कारण बँकिंग क्षेत्रात होत असलेल्या सुधारणा, आरबीआयची धोरणं आणि डिजिटलायझेशन यामुळं बँकांचा व्यवसाय अधिक वेगाने वाढण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात बँकांनी सुमारे 1.23 लाख लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. गेल्या 10 वर्षांतील या विक्रमी नोकऱ्या आहेत. या काळात खासगी बँकांनी सर्वाधिक नोकऱ्या दिल्या आहेत. पुढील आर्थिक वर्षात बँका अधिक नोकऱ्या देतील अशी अपेक्षा आहे.
खासगी बँकांनी जास्तीत जास्त नोकऱ्या दिल्या
महानगरे आणि मोठ्या शहरांमध्ये आपली पकड प्रस्थापित करणाऱ्या खासगी बँका आता टियर-3 आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळं नवीन नोकऱ्या देण्यात खासगी बँका आघाडीवर आहेत. त्यांनी ग्राहक सुविधा, कर्ज, विमा आणि तंत्रज्ञान विभागात जास्तीत जास्त नोकऱ्या दिल्या आहेत. खासगी क्षेत्रातील HDFC बँक, ICICI बँक, Axis बँक, कोटक महिंद्रा बँक, IndusInd बँक, IDFC फर्स्ट बँक, बंधन बँक आणि AU बँक यांनी 2023 मध्ये त्यांच्या विस्तार योजनांमुळं दररोज शेकडो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. आर्थिक वर्ष 2011 मध्ये बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या देण्यात आल्या होत्या.
बँकांमध्ये 17 लाखांहून अधिक कर्मचारी
2022 च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023 मध्ये बँकांमधील एकूण नोकऱ्यांची संख्या 7.4 टक्क्यांनी वाढली आहे. सध्या सरकारी आणि खासगी बँकांमध्ये सुमारे 17 लाख लोक कार्यरत आहेत. तज्ज्ञांच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस नवीन नोकऱ्यांची संख्या सहज 1.25 लाखांच्या पुढे जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
लहान शहरे आणि गावांमध्ये व्यवसाय ताब्यात घेण्याची तयारी
खासगी बँकांना लहान शहरे आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी दिसत आहेत. या भागात फक्त सरकारी बँकांचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं नव्या नोकर्या करून खासगी बँकांना या क्षेत्रात आपली पकड मजबूत करायची आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासोबतच या बँका शाखा वाढवण्यावरही भर देत आहेत. झपाट्याने वाढणारी अर्थव्यवस्था, किरकोळ कर्जे आणि घरांची वाढती मागणी यामुळे नोकऱ्या वाढवण्याचे वातावरणही निर्माण झाले आहे. याशिवाय बँकांनाही जुन्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी झगडावे लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
बँक कर्मचाऱ्यांना मिळणार खुशखबर! 'या' दोन गोष्टींचा मिळणार लाभ, सविस्तर बातमी एका क्लिकवर