BOB Recruitment 2022 : BOB मध्ये नोकरी करण्याची संधी, 26 पदांची भरती, लवकरात लवकर अर्ज करा
BOB Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदानं कृषी विपणन अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.

BOB Recruitment 2022 : बँकेत नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदानं कृषी विपणन अधिकारी पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पात्र उमेदवार बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाइट bankofbaroda.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2022 आहे. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील 26 पदं भरण्यात येणार असून 10 जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.
या जागांसाठी भरती :
पाटना : 4 पदं
चेन्नई : 3 पदं
मंगंळुरु : 2 पदं
नवी दिल्ली : 1 पदं
राजकोट : 2 पदं
चंडीगड : 4 पदं
एर्नाकुलम : 2 पदं
कोलकाता : 3 पदं
मेरठ : 3 पदं
अहमदाबाद : 2 पदं
अत्यावश्यक शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे अधिसूचनेत दिलेल्या संबंधित विषयातील 4 वर्षांची पदवी असणं आवश्यक आहे.
वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा 25 ते 40 वर्षांच्या दरम्यान असावी.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड शॉर्टलिस्टिंग आणि त्यानंतरच्या वैयक्तिक मुलाखत (PI) आणि/किंवा इतर कोणत्याही निवड पद्धतीवर आधारित असेल. कोणतेही निकष, निवड पद्धत आणि अंतिम वाटप इत्यादी बदलण्याचा (रद्द/सुधारणा/जोडण्याचा) अधिकार बँकेकडे आहे.
अर्ज शुल्क
अर्जाची फी सामान्य, EWS आणि OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी 600 रुपये आणि SC, ST, PWD आणि महिला उमेदवारांसाठी 100 रुपये आहे. इतर कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेब साइटची मदत घेऊ शकतात.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- MPSC च्या कक्षेतील 100 टक्के पदांची भरती होणार, शासन निर्णय जारी
- Indian Railway Recruitment 2022 : भारतीय रेल्वेच्या 'या' विभागासाठी मेगा भरती; अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या
- SBI Recruitment : State Bank of India मध्ये भरती, अधिकारी पदांसाठी जागा, जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
