BOB Recruitment 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरती, लवकर करा अर्ज, वाचा सविस्तर
BOB Jobs 2022 : बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) स्पेशलिस्ट ऑफिसरच्या 300 हून अधिक पदांवर मोठी भरती करण्यात येणार आहे.
Bank of Baroda Recruitment 2022 : बँकेमध्ये नोकरीची (Bank Job) संधी मिळण्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तरुणांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) बंपर भरती करण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदामध्ये (BOB) स्पेशलिस्ट ऑफिसरच्या 300 हून अधिक पदांवर भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यासाठी अर्जाची प्रक्रिया 22 जून रोजी सुरु झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार 12 जुलैपर्यंत अर्ज करु शकतात. यासाठी उमेदवारांना bankofbaroda.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेमध्ये 325 पदांवर भरती करण्यात येणार आहे.
रिक्त जागांचा तपशील
- कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट : 100 पदं
- क्रेडिट विश्लेषक : 100 पदं
- संबंध व्यवस्थापक : 75 पदे
- कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट : 50 पदे
भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता
या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज करण्यासाठी संबंध व्यवस्थापकाच्या पदासाठी इच्छुक उमेदवाराचे पदवी शिक्षण पूर्ण झालेलं असावं. तर क्रेडिट विश्लेषकाच्या पदासाठी इच्छुक उमेदवाराने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेलं असावं.
किती पगार मिळेल?
- कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट : 69,180 रुपये
- क्रेडिट विश्लेषक : 78,230 रुपये
- संबंध व्यवस्थापक : 89,890 रुपये
- कॉर्पोरेट आणि संस्था क्रेडिट : 78,230 रुपये
अर्ज कसा कराल, जाणून घ्या.
पायरी 1 : याभरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना http://www.bankofbaroda.co.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
पायरी 2 : होमपेजवर Current Opportunities हा पर्याय निवडा.
पायरी 3 : त्यानंतर उमेदवाराने स्पेशलिस्ट ऑफिसर भरती 2022 यासाठीच्या लिंकवर क्लिक करावे.
पायरी 4 : त्यानंतर समोर दिलेल्या अर्जावर आवश्यक माहिती भरून ऑनलाईन भरावा.
पायरी 5 : उमेदवारानं अर्जामध्ये योग्य तपशील भरल्यानंतर अर्ज जमा करुन अर्जाचे शल्क भरावे.
अर्जाचं शुल्क
याभरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी General आणि OBC/EWS उमेदवारांना 600 रुपये शुल्क भरावे लागेल. तर आरक्षित वर्गातील (ST/SC/PwD) उमेदवार आणि महिलांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या