NFDC Recruitment 2022 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, प्रतिमाह 1 लाख वेतन मिळवण्याची संधी
NFDC Recruitment 2022 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने प्रोग्रामरच्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत, जाणून घ्या तुम्ही अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत...
![NFDC Recruitment 2022 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, प्रतिमाह 1 लाख वेतन मिळवण्याची संधी NFDC Recruitment 2022 national film development corporation has released notification for recruitment of programmer posts NFDC Recruitment 2022 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये बंपर भरती, प्रतिमाह 1 लाख वेतन मिळवण्याची संधी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/07/7d0d47ea425fcdffa062f86402efdfc1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
NFDC Recruitment 2022 : भारतीय राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळानं (National Film Development Corporation of India) प्रोग्रामर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 34 रिक्त पदं काढण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 4 जुलै 2022 पासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2022 आहे. कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी, पदविका किंवा पदव्युत्तर पदवी घेतलेले इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन सबमिट करू शकतात.
पदांची संख्या : 34
NFDC भर्ती 2022 मधील महत्त्वाची तारखा
भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 04 जुलै 2022
भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जुलै 2022
कोणत्या पदांवर भरती?
- चित्रपट प्रोग्रामर
- सहाय्यक चित्रपट प्रोग्रामर
- फेस्टिवल को ऑर्डिनेटर
- डेलिगेट रजिस्ट्रेशन
- फिल्म शेड्यूलर
- फेस्टिवल असिस्टंट
- अटेंडर
- डेप्युटी डायरेक्टर
- सीनियर/ज्युनियर प्रोग्रामर
- कंसल्टंट
- असिस्टंट प्रोग्रामिंग कोऑर्डिनेटर
- संपादक/सहाय्यक
- ज्युनियर कार्यकारी
- वरिष्ठ प्रोग्रामर
- सीनियर प्रोग्रामर असिस्टंट
- प्रूफ रिडर
- आंतरराष्ट्रीय अतिथी संबंध/घरगुती अतिथी संबंधांचे कार्यकारी
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा 45 वर्ष आहे.
वेतनश्रेणी
या पदांसाठी निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांचं वेतन 30000 ते 120000 रुपये असेल. तसेच, उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाइटवर अधिसूचना वाचण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)