एक्स्प्लोर
Advertisement
गंभीरचा लाजिरवाणा तर रैनाचा अभिमानास्पद विक्रम
कानपूर : कानपूरच्या ग्रीन पार्कवर पहिल्यांदाच आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात गुजरात लायन्सने कोलकाता नाईटरायडर्सला सहा विकेट्सनी पराभूत केलं. कानपूरच्या या मैदानात एकीकडे नवा इतिहास रचला तर दुसरीकडे याच सामन्यात दोन्ही संघांच्या कर्णाधारांच्या नावावरही अनोखा विक्रम जमा झाला.
गंभीरचा लाजिरवाणा विक्रम
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर हा ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये जास्त वेळा धावचीत होण्याचा लाजिरवाणा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. टी-20 मध्ये गंभीर आतापर्यंत तब्बल 21 वेळा धावचीत झाला आहे. आयपीएलमधील गुरुवारच्या सामन्यात गंभीर 8 धावा करुन रनआऊट झाला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात गंभीर आतापर्यंत 4 आणि आयपीएलमध्ये एकूण 15 वेळा बाद झाला आहे.
आयपीएलमध्ये रैनाच्या सर्वाधिक धावा
तर दुसरीकडे गुजरात लायन्सचा कर्णधार सुरेश रैना हा आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये 4000 धावा करणारा करणारा रैना दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्या खात्यात आता 4038 धावा जमा झाले आहेत. त्याच्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने 4002 धावा केल्या होता. कोहली आता दुसऱ्या स्थानावर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement