एक्स्प्लोर
आशिष नेहरावर लवकरच शस्त्रक्रिया
मुंबई : भारताचा वेगवान गोलंदाज आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचा शिलेदार आशिष नेहरा याच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी ही माहिती दिली.
आयपीएलमध्ये पंजाब विरुद्धच्या सामन्यात नेहराच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे नेहराने आयपीएलच्या उर्वरीत सामन्यांतून माघार घेतली होती.
यानंतर आशिष नेहराच्या दुखापतीवर लंडनमध्ये तपासणी करण्यात आली. त्यावेळी डॉक्टरांनी नेहराच्या उजव्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
आशिष नेहराने आयपीएलच्या यंदाच्या मोसमात हैदराबादकडून 8 सामन्यांत 9 विकेट्स काढल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement