वॉटर मार्क: भारतीय नोटांवरील गांधीजींचा फोटो जर हलक्या शेडमध्ये असलेल्या जागेवर तिरके करुन पाहिल्यास वॉटर मार्क दिसून येतो.
2/12
सेक्यूरिटी थ्रेड: नोटांच्या मध्यभागी सरळ रेषेचं बारकाईनं निरीक्षण केल्यास हिंदीमध्ये भारत आणि आरबीआय लिहलेलं दिसतं. याला सेक्यूरिटी थ्रेड असं म्हणतात. हे अतिशय पातळ असून, नुसतं डोळ्यांनी पाहिल्यास ते दिसत नाही. मात्र, बारकाईने निरीक्षण केल्यास यावरील लिहलेली अक्षरे सहज दिसतात.
3/12
आरबीआयच्या दिलेल्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे खऱ्या आणि बनावट नोटा ओळखण्याची पद्धती तुम्हाला सांगितली. तेव्हा तुमच्या नोटा खऱ्या आहेत की बनावट हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला याचा नक्की फायदा होईल.
4/12
ऑप्टिकल व्हेरिएबल इंक: ऑप्टिकल व्हेरिएबल इंकचा वापर 1000 आणि 500 रुपयांच्या नोटांसाठी खास करुन केला जातो. नोटांच्या मध्यभागी 500 आणि 1000 चे अंक प्रिंट करण्यासाठी या शाईचा वापर केला जातो. जेव्हा तुम्ही एखादी नोट सरळ पकडता, तेव्हा ते अंक हिरव्या रंगात दिसतात. पण वेगवेगळ्या बाजूने पाहिल्यास याचा रंग बदलत असल्याचं जाणवतं. तुम्ही खऱ्या आणि बनावट नोटा कसा ओळखू शकाल याचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील, ज्याच्या माध्यमातूनही तुम्ही हे जाणून घेऊ शकाल.
5/12
आरबीआयने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 1000 रुपयांच्या बनावट नोटांची सीरीज संख्या 2AQ आणि 8ACने सुरु होते. तसेच यावर डॉ. वाय. व्ही. रेड्डी यांची स्वाक्षरीही खोटी आहे. त्यामुळे या नोटा कोणीही स्विकारु नयेत, असा सल्ला आरबीआयने दिला आहे. तसेच, जर कोणी या सीरीजच्या बनावट नोटा देताना आढळल्यास, त्याची माहिती बँकेला देण्याचं आवाहनही केलं आहे. आरबीआयने या सीरीजच्या बनावट नोटा कशा ओळखाव्यात? याची माहिती परिपत्रकातून दिली आहे. पण इतर रुपयांच्या बनावट नोटा कशा ओळखाव्यात याचीही माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
6/12
फ्लोरेसेंस: नोटांवर खालच्या बाजूला जो नंबर दिलेला असतो, तो सर्व एका विशिष्ट सीरीजचा असतो. हा नंबर खास नोटांसाठीच बनवला जातो. या नंबर्सना फ्लोरीसेंट इंकने प्रिंट केलं जातं. त्यामुळे जेव्हा तुम्ही ती नोट अस्ट्रावॉयलेट लाईटमध्ये पाहता, तेव्हा ते ठळकपणे दिसतात.
7/12
लेटेंट इमेज: नोटांवर गांधींजींच्या फोटोच्या बाजूला एक लटेंट इमेज असते. ज्यामध्ये ती नोट जितक्या रुपयांची आहे, ती सांख्या दिसते. नोट सरळ धरल्यानंतर ते सहज पाहायला मिळते.
8/12
आयडेंटिफिकेशन मार्क: हा मार्क वॉटर मार्कच्या उजव्या बाजूला असून सर्व नोटांवर हा वेगवेगळ्या आकारात असतो. उदाहरणार्थ, 20 रुपयांच्या नोटांवर हा व्हर्टिकल रेक्टॅंगल (उभा अयातकृती) आकारात, तर 50 रुपयांच्या नोटांवर चौकोनी आकारात असतो. 100 रुपयांच्या नोटांवर त्रिकोणी अकृतीत, 500 रुपयांच्या नोटांवर हा मार्क गोलाकार असतो, आणि सर्वात शेवटी म्हणजे 1000 रुपयांच्या नोटांवर हा मार्क डायमंड (चौकटीसारखा) असतो.
9/12
मायक्रोलेटरिंग: जर नोटांचे बारकाईने निरिक्षण केलं, तर गांधीजींच्या फोटोजवळ मायक्रो लेटरमध्ये संख्या लिहल्याचे दिसते. 5 रुपये, 10 रुपये आणि 20 रुपयांच्या नोटांवर आरबीआय हे इंग्रजीत लिहलेलं असतं. यापेक्षा जास्त किमतीच्या नोटांवर मायक्रो लेटरिंग केलं जातं.
10/12
भारतात बनावट नोटांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे सरकारलाही कोट्यवधी रुपयांचं नुकसान सहन करावं लागतय. त्यामुळे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने यासंबंधी एक परिपत्रक काढून नागरिकांना बनावट नोटा तपासण्याची प्रक्रिया सांगितली आहे. रिझर्व्ह बँकेने बनावट नोटा ओळखण्याच्या सांगितलेल्या पद्धतींची तुम्हीही अंमलबजावणी करुन याच्या त्रासातून मुक्त होऊ शकता.
11/12
इंटेग्लिओ प्रिंटिंग: प्रत्येक नोटांवर वापरण्यात येणारी शाई एका विशिष्ट प्रकारची असते. यामुळे नोटांना स्पर्श करताच महात्मा गांधींचा फोटो, रिझर्व्ह बँकेची मुद्रा, आरबीआय गव्हर्नरांचे हस्ताक्षर आणि त्यांचे वचन हात फिरवल्यानंतर जाणवतं.
12/12
सी टू रजिस्ट्रेशन: सी टू रजिस्ट्रेशन हे वॉटर मार्कच्या बाजूला, फ्लोरल डिझाईनच्या रुपात असतं. हे नोटांच्या दोन्ही बाजूला असतं. एका बाजूला हे रिकामं असतं, तर दुसऱ्या बाजूला मात्र, पूर्णपणे भरलेलं असतं.