एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Loksabha Election 2019 6th phase : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत देशभरात 59.70 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान

LIVE

Loksabha Election 2019 6th phase : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात सहा वाजेपर्यंत देशभरात 59.70 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान

Background

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यामध्ये सात राज्यांमधील 59 जागांवर आज मतदान होत आहे. या सहाव्या टप्प्यात दिल्लीतील सर्व 7 आणि हरियाणामधील सर्व 10 जागांशिवाय उत्तरप्रदेशातील 14, बिहार, मध्यप्रदेश आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी 8-8 तर झारखंडमधील 4 जागांवर मतदान होत आहे.

या टप्प्यात 10 कोटी 16 लाख हून  अधिक मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. झारखंडमधील धनबाद वगळता उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हरियाणासह बाकीच्या राज्यांमध्ये सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या टप्प्यात एकूण 979 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.

मध्य प्रदेशमधली भोपाळ, नवी दिल्ली आणि आझमगडच्या जागांवर दिग्गजांची अग्निपरीक्षा असेल. भोपाळमध्ये भाजपकडून साध्वी प्रज्ञा सिंह विरोधात काँग्रेसचे दिग्विजय मैदानात आहेत. साध्वी यांच्या वादग्रस्त विधानांमुळे भोपाळची निवडणूक ही चर्चेत राहिली आहे. तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह यांनी देखील साध्वी प्रज्ञासिंहला टक्कर देण्यासाठी प्रचारादरम्यान सॉफ्ट हिंदुत्वाचा वापर केला.

लोकसभेच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चिली गेली ती भोपाळजी जागा. कारण काँग्रेसच्या दिग्विजय सिंहांविरोधात भाजपनं इथे प्रज्ञा साध्वीला उतरवलं. साध्वीच्या वादग्रस्त विधानांमुळे कायमच ती चर्चेत राहिली.

तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचा गढ असलेल्या आजमगढमध्ये यावेळी अखिलेश यादव रिंगणात आहेत. वडील मुलायमसिंह यादव यांच्या जागी अखिलेश यंदा या जागेवरून लढत आहेत. याशिवाय मनेका गांधी यांनीही यावेळेला आपला मतदारसंघ बदलला आहे. विद्यमान खासदार आणि मुलगा वरूण गांधींची जागा असलेल्या सुल्तानपूरमधून मनेका गांधी रिंगणात आहेत.

मध्यप्रदेश मधील मुरैना येथून केंद्रीय मंत्री नरेन्द्र सिंह तोमर भाजपकडून मैदानात आहेत. गुनामधून काँग्रेसचे नेते कांग्रेस नेते ज्योतिरादित्य सिंधिया मैदानात आहेत. तर हरियाणामधून माजी मुख्यमंत्री भूपेन्द्र सिंह हुड्डा काँग्रेसकडून मैदानात आहेत. दिल्लीमधून मुख्यमंत्री शीला दीक्षित काँग्रेसकडून उत्तर पूर्व दिल्ली मतदारसंघातून तर केंद्रीय मंत्री हर्षवर्धन भाजपकडून चांदनी चौक मतदारसंघातून लढत आहेत.

18:43 PM (IST)  •  12 May 2019

सहाव्या टप्प्यात देशात 59.70 टक्के मतदान : बिहार - 55.04 टक्के, हरयाणा - 62.08 टक्के, मध्यप्रदेश - 60.7 टक्के, उत्तरप्रदेश - 50.65 टक्के, प.बंगाल - 80 टक्के, झारखंड - 65.15 टक्के, #NCT दिल्ली - 54.84 टक्के
18:30 PM (IST)  •  12 May 2019

1. लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात 7 राज्यातील 59 जागांसाठी मतदान, दुपारी सहा वाजेपर्यंत देशभरात 59.70 टक्के तर पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 80 टक्के मतदान
16:25 PM (IST)  •  12 May 2019

भोपाळमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 52 टक्क्यांहून अधिक मतदान, मतदानाचा उत्साह पाहता 2014 पेक्षा यावेळी अधिक मतदान होण्याची शक्यता
12:40 PM (IST)  •  12 May 2019

#LokSabhaElections2019 सहाव्या टप्प्यात देशात 12 वाजेपर्यंत 25.05 टक्क्यांच्या वर मतदान ▶️ बिहार - 20.70 टक्के ▶️ हरियाणा - 23.19 ▶️मध्यप्रदेश - 28.01 ▶️उत्तरप्रदेश - 21.75 ▶️प.बंगाल - 38.08 ▶️झारखंड -31.37 ▶️दिल्ली - 79.49
14:08 PM (IST)  •  12 May 2019

#LokSabhaElections2019 दुपारी एक वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : ▶️बिहार- 35.22 % ▶️हरियाणा -38.69 ▶️मध्य प्रदेश - 42.14 ▶️उत्तर प्रदेश - 34.30 % ▶️पश्चिम बंगाल- 55.58 % ▶️झारखंड - 47.16 % ▶️नवी दिल्ली 32.98 %
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Media Center : मल्लिकार्जून खरगेंकडून बॅलट पेपरवर मतदानाची मागणीZero Hour Eknath Shinde : एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय लांबतोय?ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
Embed widget