LIVE BLOG : सुषमा स्वराज यांचे पार्थिव अनंतात विलीन

Background
१. देशाच्या राजकीय इतिहासातील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपलं, हृदयविकाराच्या झटक्यानं सुषमा स्वराज यांचं निधन, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
२. सुषमा स्वराज यांचं पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार, सकाळी 11 पर्यंत निवासस्थानी तर 12 ते 3 पर्यंत भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार
३. देशाच्या राजकारणातील झळाळता अध्याय संपला, स्वराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, तर उत्तम मार्गदर्शक गमावल्याची अनेक नेत्यांची भावना
४. कलम-370 मुक्त जम्मू-काश्मीरचं भाजपचं स्वप्न साकार, राज्यसभेनंतर लोकसभेतही 370 रद्द करण्याचं विधेयक मंजूर, अमित शाहांकडून विरोधकांचा समाचार
५. शिवसेना खासदार संजय राऊतांचे पोस्टर्स इस्लामाबादेत झळकले, राऊतांच्या बलुचिस्तानबद्दलच्या विधानाचे पाकिस्तानमध्ये पडसाद
६. कोल्हापुरात पावसानं सर्व विक्रम मोडले,बचावकार्यासाठी लष्कर दाखल, सांगली, साताऱ्यासह महाडमध्ये महापूर, पुढील 72 तास मुसळधार पावसाचा इशारा























