एक्स्प्लोर

India At 2047 : श्रीमंत देशांच्या कोरोना लस राष्ट्रवादाला भारताचे चोख प्रत्युत्तर

India At 2047 : कोरोना महामारीच्या सर्वोच्च काळात भारताने जगभरातील 101 देशांना आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटनांना 239 दशलक्ष मोफत कोरोना प्रतिबंधक लसचा पुरवठा केला.

India At 2047 : गेल्या दोन-अडीच वर्षांत कोरोना (Corona) महामारीने संपूर्ण जग उद्ध्वस्त होताना पाहिले. भारत देखील यातून सुटला नाही. परंतु, जगभरातील अनेक बलाढ्य देशांपेक्षा भारताने या महामारीचा सामना खूप चांगल्या प्रकारे केला.  ज्याचे जगाने कौतुक केले आहे. या गोष्टीचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. एवढेच नाही तर भारताने इतर अनेक देशांना मदत केली आहे आणि अजूनही मदत सुरूच आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांत आणि विशेषत: कोरोना महामारीच्या काळात, भारताने संकटातून संधी शोधली आहे. 

आज जागतिक स्तरावर भारताच्या भूमिकेकडे कोणीही दुर्लक्ष करू शकत नाही. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वीच जेनेरिक औषधे आणि लस तयार करण्याच्या भारताच्या क्षमतेने जागतिक आरोग्य सुरक्षेत महत्त्वपूर्ण स्थान मिळवले होते. जगभरात एचआयव्ही ग्रस्त असलेल्या 92 टक्क्यांहून अधिक लोक भारतात बनवलेली जीवनरक्षक अँटीरेट्रोव्हायरल औषधे घेतात. ही औषधे भारतीय जेनेरिक फार्मास्युटिकल उत्पादकांनी तयार केली आहेत. भारताने बनवलेल्या शेकडो जीवरक्षक औषधांच्या आणि लसींच्या बाबतीतही हेच आहे.

जीवघेण्या संसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी जागतिक स्तरावर वापरल्या जाणार्‍या लसीच्या 80 टक्क्यांहून अधिक डोस भारतात बनवले गेले आणि जगाला पुरवले गेले.   सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया-एसआयआय ऑफ इंडिया -एसआयआयला जगातील सर्वात मोठी लस उत्पादक निर्माता म्हणून ओळखले गेले. अलीकडे  जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने सीरमचे प्रमुख सायरस पूनावाला यांना डीनचे पदक प्रदान केले. गोवर लसीकरणातील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला. याच लसीने 1990 आणि 2016 मध्ये जागतिक स्तरावर 22 दशलक्ष जीव वाचवण्यास मदत केली. 


भारताने इतर देशांना एचआयव्ही, क्षयरोग आणि इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार करण्यासाठी औषधांसह मदत केली आहे, तर दुसरीकडे या देशांनी इतर शेकडो औषधांपर्यंत पोहचण्यासाठी मदत केली आहे. याचवेळी आपल्या देशात देखील भारत  आजारांना तोंड देत होता. आज भारतात सुमारे 1.5 दशलक्ष लोक एचआयव्ही-पीएलएचआयव्ही ग्रस्त आहेत. भारत या लोकांना आयुष्यभरासाठी मोफत औषधांचा पुरवठा करत आहे. एवढेच नाही तर जगात एचआयव्ही ग्रस्त असलेल्या प्रत्येक 10 पैकी 9 लोक भारतात बनवलेली ही औषधे घेऊन निरोगी जीवन जगत आहेत. 

साथीच्या रोगामुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी आणि मानवतावादी संकट असूनही भारतातील औषध आणि लस उत्पादकांनी हार मानली नाही. अनेकदा शक्तिशाली बहुराष्ट्रीय फार्मा लॉबी देखील भारतातील औषध कंपन्यांना कॉपी-कॅट म्हणून लेबल लावतात. परंतु श्रीमंत देशांकडून दीर्घकाळ टीका होऊनही संस्था टिकून राहिल्या.  भारताने केवळ देशातील सर्वात मोठ्या लस मोहिमेचे नेतृत्व केले नाही तर जगभरातील कमी आणि मध्यम-उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (LMICs) लसीचे डोस पुरवले.  

कोरोना महामारीच्या सर्वोच्च काळात भारताने जगभरातील 101 देशांना आणि संयुक्त राष्ट्रसंघाच्या संघटनांना 239 दशलक्ष मोफत कोरोना प्रतिबंधक लसचा पुरवठा केला. यासोबतच आपल्या देशवासीयांचेही लसीकरण करण्यात आले. याशिवाय जागतिक स्तरावर भारतीय कंपन्यांनीही परवडणाऱ्या किमतीत लसींचा पुरवठा केला. भारताने दक्षिण आशियाई शेजारी देशांना अशा वेळी भारतीय लसींचा पुरवठा केला होता, जेव्हा श्रीमंत राष्ट्रे लसींचा प्रचंड साठा दडपून ठेवत होत्या. मात्र, यावर श्रीमंत देशांकडून बरीच टीका झाली. हेच कारण होते की नंतर या देशांनी एक्सपायरी डेट जवळ पोहोचलेली लस नष्ट करण्यास सुरुवात केली, खरंतर हा मानवतेविरुद्धचा गुन्हा होता.

तिसर्‍या आणि चौथ्यांदा आपल्या लोकांना लस दिल्यानंतर या देशांनी लसीचे लाखो डोस फेकून दिले. कारण त्यांची मुदत संपली होती. हे डोस त्या लोकांपर्यंत वेळेत पोहोचू शकले नाहीत, ज्यांना त्याचा पहिला डोसही मिळू शकला नाही? यामुळे वारंवार या देशांनी गरीब देशांतील लोकांपेक्षा आपले जीवन अधिक मौल्यवान असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला.  

कोरोना आजाराच्या सुरुवातीच्या दिवसांपासून हे स्पष्ट झाले होते की, या साथीच्या आजारातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जगातील या लसीसाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण करणे. श्रीमंत देशांनी त्यांच्या लसीकरण केलेल्या लोकसंख्येला तीन ते पाच वेळा लसीकरण केले आहे. त्याच वेळी जगात अजूनही अनेक कमी उत्पन्न असलेले देश आहेत, जिथे 40 टक्के लसीकरणाचे उद्दिष्टही पूर्ण झालेले नाही. तर जगातील श्रीमंत देशांसाठी हे लसीकरणाचे असे उद्दिष्ट होते जे त्यांनी लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात एकाच महिन्यात पूर्ण केले होते.  

जगात कोरोना लसीच्या बाबतीत अत्यंत पक्षपातीपणा स्पष्टपणे दिसून आला. सात अब्जाहून अधिक लोकांच्या या जगात आतापर्यंत कोविड लसीचे 12 अब्ज डोस देण्यात आले आहेत. जगभरात प्रति 100 लोकांमागे सुमारे 152 शॉट्स उपलब्ध होते. परंतु मे 2022 पर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस दिल्यानंतर जी परिस्थिती दिसून आली त्यावरून श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी स्पष्टपणे दिसून येते. पहिली लस दिल्यानंतर जवळजवळ 18 महिन्यांनंतर 68 देशांनी अद्याप 40 टक्के कव्हरेज प्राप्त केलेले नाही. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये केवळ 16 टक्के लोकसंख्येला लसीचा पहिला डोस मिळाला आहे.

जागतिक स्तरावर सरासरी सुमारे तीन चतुर्थांश आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीकरण केले गेले आहे. परंतु कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये परिस्थिती अगदी उलट आहे. तेथे कोविड लस लागू करण्याचे प्रमाण खूपच कमी आहे.  

कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांतील लोकांना केवळ लसीचे कमी डोस मिळालेले नाहीत किंवा त्यांना लसीचा पूर्ण डोस मिळाला तरी खूप उशीर झाला होता. अनेकवेळा असे घडले की लस जरी या देशांत पोहोचली तरी ती त्याच्या एक्सपायरी डेटच्या जवळ पोहोचली होती. 

विशेष म्हणजे, कोवॅक्स सुविधा ही जगातील लसींच्या समान वितरणासाठी संयुक्त राष्ट्र (UN)-WHO चा पुढाकार आहे. परंतु, बहुतेक युरोपमधून पाठवण्यात आलेली ही लस एक्सपायरी डेटच्या जवळ आली होती. यामुळे नायजेरिया त्यांची मुदत संपण्यापूर्वी केवळ 1.53 दशलक्ष डोस देऊ शकला. उर्वरित 1.07 दशलक्ष डोसची मुदत संपल्यामुळे फेकून देण्यात आले.  

2021 मध्ये इस्रायल सारख्या देश संपूर्ण लसीकरण करण्यात पुढे होते, त्यांनी महामारी नियंत्रणात आणली आहे. येथे कोरोना विषाणूची लागण झालेल्या फारच कमी लोकांना रुग्णालयात आणि आयसीयूमध्ये दाखल गेले. तरीही ते लसीकरण वाढविण्यात अपयशी ठरले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gopal Shetty Borivali constituency : मी बोरिवलीतून माघार न घेण्यावर ठाम, गोपाळ शेट्टींनी स्पष्ट सांगितलंSada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाणABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 02 November 2024Eknath shinde On Sada Sarvankar : माहिममध्ये आमचा आमदार दोन ते तीन टर्म, उमेदवारी मागे न घेण्याचे  मुख्यमंत्र्यांचे संकेत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar: देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
देवेंद्र फडणवीसांवर विश्वास आहे पण... महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रातील घसरणीवर शरद पवारांचं भाष्य
Satej Patil on CM Eknath Shinde : फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
फोडाफोडी, गुवाहाटी, सुरत लोकं विसरली नाहीत; सतेज पाटलांचा सीएम एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
Sada Sarvankar Mahim Vidhansabha : सरवणकर ठाम, एकनाथ शिंदेंचे राज ठाकरेंवर बाण
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
CM शिंदेंपासून फडणवीसांना धोका? संजय राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर गिरीश महाजनांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले...
Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला
Sada Sarvankar Mahim: सदा सरवणकर म्हणाले, 'आम्हाला पक्ष जिवंत ठेवायचाय, मला माहीममधून लढावचं लागेल'
दिलं तर चांगलं, नाही दिलं तर वाईट, ही वृत्ती बरी नव्हे; सदा सरवणकरांचा मनसेवर बोचरा वार
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
माजी मंत्र्याची काँग्रेसला सोडचिट्टी देत 'वंचित'मध्ये, पण उमेदवारी अर्ज भरण्यापासून 'वंचित'; आता पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार!
Embed widget