Fact Check : दुबईचा राजकुमार खरंच वंदे मातरम् गीत गातोय का? जाणून घ्या इन्स्टाग्राच्या व्हायरल पोस्टमागचं सत्य नेमकं काय?
Fact Check : कुवैतमधील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडीओत एक व्यक्ती वंदे मातरम् हे गीत गाताना दिसतोय. ही व्यक्ती कुवेतचे राजकुमार आहेत, असा दावा केला जात होता.

नवी दिल्ली : सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती अरबी पोशाखात दिसत आहे. ही व्यक्त एका सभागृहामध्ये वंदे मातरम् गीत गाताना दिसतो आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ दुबईच्या राजकुमाराचा आहे, असा दावा केला जात आहे. सोबतच हा राजकुमार वंदे मातरम् हे गीत गात असल्याचे सांगितले जात आहे. असे असतानाच आम्ही या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली. व्हिडीओत दिसणारी व्यक्ती खरंच वंदे मातरमम गीत गातेय का? हे आम्ही शोधले.
विश्वास न्यूजने या व्हिडीओची सत्यता तपासली आहे. या तपासात असे आढळून आले की, या व्हायरल व्हिडिओमध्ये दुबईच्या राजकुमाराच्या संबंधित केलेला दावा खोटा आहे. हा व्हिडीओ कुवैतमधील आहे. डिसेंबर 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुवैतला भेट दिली होती, त्या भेटीदरम्यानचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओमधील व्यक्ती कोणता राजकुमार नसून तो कुवेती गायक आहे. या गायकांचे नाव मुकाबर अल रशीद असे आहे. रशीद यांनी 'हाला मोदी' या कार्यक्रमात ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम्’ हे गीत गायले होते.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये नेमके काय आहे?
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला होता. या पोस्टमध्ये 'दुबईचे राजकुमार' असे लिहण्यात आले होते. “फक्त भारतातच वंदे मातरम् म्हणण्यात अडचण आहे, नाहीतर यांचे वडील किती आनंदाने हे गीत गात आहेत, पाहा...” जर तुम्ही कट्टर हिंदू असाल तर, या पेजला नक्की शेअर करा आणि फॉलो करा. जय श्री राम, असे या पोस्टमध्ये म्हणण्यात आले होते.
या पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहा
तपासात नेमकं काय आढळलं?
या व्हिडीओमागची सत्यता तपासण्याचा आम्ही प्रयत्न केला. इन्स्टाग्रामवरील या व्हिडीओत 'हाला मोदी' असे इंग्रजी आणि अरबी भाषेत लिहिलेले दिसत आहे. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटोही दिसत आहे. सत्यता तपासण्यासाठी या व्हिडीओचे आम्ही की फ्रेम काढले आणि गुगल लेन्सद्वारे कीवर्डच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. शोधाअंती हा व्हिडीओ फेसबुक पेजवर अपलोड करण्यात आला होता, असे आम्हाला समजले. या व्हिडीओमध्ये दिलेल्या माहितीनुसार व्हिडीओत दिसणारे राजकुमार नसून कुवेतचे गायक मुबारक अलर-शीद आहेत.
शोधामध्ये आम्हाला हैदराबाद 24X7 नावाच्या फेसबुक पेजवरही हा व्हिडीओ अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडीओ 25 डिसेंबर 2024 रोजी अपलोड करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये कुवेती गायक मुबारक अल-रशीद आहेत, ज्यांनी ‘हाला मोदी’ मध्ये ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम’ गीत गायल्याचे सांगण्यात आले होते.
आम्ही मुबारक अल-रशीद यांच्याविषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. या शोधात आम्हाला त्यांचे इन्स्टाग्राम खाते सापडले. या त्यांच्या खात्यावरही व्हायरल व्हिडीओची एक क्लिप अपलोड करण्यात आले होती. या मूळ व्हिडीओच्या पोस्टमध्ये ‘ मी माझ्या देशाचे म्हणजेच कुवेतचे प्रतिनिधित्व केले आणि पंतप्रधानांच्या कुवेत दौऱ्याचा भाग झाल्याने मला खूप आनंद झाला आहे,' असे म्हणण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या बातमीचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. या शोधात आम्हाला अमर उजाला या वृत्तसंकेतस्थळावर या कार्यक्रमाशी संबंधित बातमी आढलली. 25 डिसेंबर 2024 रोजीच्या बातमीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतच्या दोन दिवसीय दौऱ्यावर होते. ते कुवेतमधील शेक साद अल अब्दुल्लाह इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये 'हाला मोदी' या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. याच कार्यक्रमत एका कुवेती गायकाने भारतीय गाणी सादर केली होती.
यासंबंधीचा व्हिडिओ 21 डिसेंबर 2024 रोजी एएनआयच्या एक्स हँडलवर अपलोड केलेला आढळला. येथे दिलेल्या माहितीनुसार, ‘हाला मोदी’ कार्यक्रमात गाणे म्हणणारी व्यक्ती, कुवेती गायक मुबारक अल-रशीद आहेत.
#WATCH | Kuwaiti singer Mubarak Al Rashed sings 'Saare Jahaan Se Accha' after attending PM Modi's community event #HalaModi at Shaikh Saad Al Abdullah Indoor Sports Complex in Kuwait pic.twitter.com/yJDKBHNTKD
— ANI (@ANI) December 21, 2024
आम्हाला मनी कंट्रोलच्या यूट्यूब चॅनेलवर एएनआयच्या सौजन्याने मुबारक अल-रशीदचा व्हिडिओ अपलोड केल्याचे आढळले. या व्हिडीओमध्ये गायक मुबारक अल रशीद हे ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम्’ हे गाणे गाताना दिसत होते.
आम्ही व्हायरल व्हिडिओची पुष्टी करण्यासाठी कुवेतचे पत्रकार मालक बकीर असद यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी पुष्टी केली की, व्हिडिओमध्ये दुबईचे राजकुमार नाहीत. या व्हिडीओत दिसणारे कुवेतचे गायक मुबारक अल-रशीद आहेत.
शेवटी हा व्हिडीओ पोस्ट करणाऱ्या ‘kattar_hindu_balak_’ या इन्स्टाग्राम खात्याचीही आम्ही स्क्रिनिंग केली. या खात्याला एकूण 1 लाख 10 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात.
निष्कर्ष: विश्वास न्यूजच्या तपासात असे आढळून आले की, व्हायरल व्हिडिओमध्ये दुबईच्या राजकुमाराविषयी केलेला दावा खोटा आहे. हा व्हिडिओ कुवेतमधील आहे. पंतप्रधान मोदी यांनी डिसेंबर 2024 मध्ये कुवेतला भेट दिली होती, तेव्हाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये कुवेती गायक मुबारक अल-रशीद आहेत. रशीद यांनी ‘हाला मोदी’ कार्यक्रमात ‘सारे जहाँ से अच्छा’ आणि ‘वंदे मातरम्’ गायले होते.
Claim Review : हा वंदे मातरम् गाणाऱ्या दुबईच्या राजकुमाराचा व्हिडिओ आहे.
Claimed By : इंस्टाग्राम वापरकर्ता- kattar_hindu_balak
Fact Check : False (असत्य)
[डिस्क्लेमर: ही बातमी पहिल्यांदा विश्वास न्यूजवर प्रकाशित झाली होती. एबीपी माझानं 'Shakti Collective' अंतर्गत हे वृत्त प्रकाशित केलं असून मूळ बातमीचा अर्थ बदलेलं असा कोणताही बदल केलेला नाही.]
हेही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
