एक्स्प्लोर

Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर

Shreyanka Patil: श्रेयंकाच्या डान्सनंतर सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. श्रेयंकाने सोशल मीडियातील ट्रोलनंतर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.

Shreyanka Patil: टीम इंडियाची क्रिकेटर जेव्हा श्रेयंका पाटील क्रिकेटच्या मैदानावर चेंडू हातात घेते, तेव्हा तिची नजर फक्त विकेटवर खिळलेली असते. मैदानावर फलंदाजांना आपल्या फिरकीत अडकवणारी ती जितकी गंभीर आणि आक्रमक दिसते, तितकीच ती कॅमेऱ्यासमोर मनमोहक आणि बिनधास्त असते. तिचा एक डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे, ज्यामध्ये ती 'बबली बदमाश है' या प्रसिद्ध बॉलिवूड गाण्यावर आपल्या स्टाईल आणि डान्स मूव्ह्सने सर्वांना चकित करताना दिसत आहे. गाणे सुरू होताच, 24वर्षीय श्रेयंकाचा चेहरामोहराच बदलतो. तिच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास, खोडकर हावभाव आणि बिनधास्त डान्स मूव्ह्स.. ती एखाद्या व्यावसायिक कलाकाराप्रमाणेच कॅमेऱ्यासमोर सहज वावरताना दिसते. मैदानावर विकेटसाठी संघर्ष करणारी ही क्रिकेटपटू आपल्या ग्लॅमरस स्टाईलने चाहत्यांना मोहित करत आहे.

सोशल मीडियातील ट्रोलनंतर सडेतोड प्रत्युत्तर 

दरम्यान, श्रेयंकाच्या डान्सनंतर सोशल मीडियात चर्चा रंगली आहे. श्रेयंकाने सोशल मीडियातील ट्रोलनंतर सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. श्रेयंकाने म्हटलं आहे की, "मला समजत नाहीये की लोक माझ्या डान्स व्हिडिओचा इतका मोठा विषय का बनवत आहेत. डान्स हा नेहमीच माझा आवडता छंद राहिला आहे आणि मी खूप काळापासून डान्सचे व्हिडिओ शेअर करत आहे. मी एक क्रिकेटपटू आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी डान्सचा आनंद घेऊ शकत नाही. जर कोणी मला फक्त डान्स करण्यासाठी ट्रोल करत असेल, तर मला वाटतं की ते माझ्यापेक्षा त्यांच्या विचारसरणीबद्दल जास्त सांगतं."

View this post on Instagram
 
A post shared by Shreyanka Patil (@shreyanka_patil31)

श्रेयंकाचा 'बबली बदमाश' गाण्यावरील जादुई परफॉर्मन्स

दुसरीकडे श्रेयंका ज्या गाण्यावर नाचत आहे, ते 2013 सालच्या 'शूटआउट अॅट वडाला' चित्रपटातील 'बबली बदमाश है' हे लोकप्रिय गाणे आहे. हे गाणे सुनिधी चौहान यांनी गायले असून, अनु मलिक यांनी संगीतबद्ध केले आहे. या गाण्यात प्रियांका चोप्राचा ग्लॅमरस अवतार स्पष्टपणे दिसून आला होता. आता, श्रेयंकाचा या गाण्यावरील डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तिच्या डान्सच्या स्टेप्स, हावभाव आणि कॅमेऱ्यासमोरचा आत्मविश्वास या व्हिडिओला खास बनवतात. मैदानावर आपल्या चेंडूने फलंदाजांना सतावणारी श्रेयंका, आपल्या करामतींनी चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना श्रेयंकाने 'जस्ट बीइंग अ बदमाश' असे कॅप्शन दिले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
ODI World Cup 2027 : क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
क्रिकेट वर्ल्डकपसाठी ICCचा मास्टरप्लॅन; महात्मा गांधींना अशी देणार अनोखी श्रद्धांजली? जय शाह मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
IND vs SL 1st Test DAY-2 Live : गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
गॉलमध्ये आभाळ फाटलं, भारत-श्रीलंका कसोटीला ब्रेक! दुसऱ्या दिवसाचं पहिलं सत्र पावसाने धुतलं, मॅच कधी होणार सुरू? जाणून घ्या LIVE अपडेट्स
AUS vs BAN 1st Test : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Embed widget