एक्स्प्लोर

Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’

Swati Deval Opens Up About Three Abortions: स्वाती देवलने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला.

Swati Deval Opens Up About Three Abortions in Interview: मराठीसह हिंदी मालिका अन् सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री स्वाती देवलने (Swati Deval) आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रसिद्धी मिळवली.  तिनं 'आम्ही सातपुते' (Amhi Satpute), 'माझी तुझी रेशीमगाठ' यांसारख्या मालिका अन् मराठी सिनेमात काम केलं.  विविध मालिकांमधून तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.  संघर्षाच्या जोरावर तिनं इथपर्यंतचा (Life Struggle) प्रवास गाठला. अलिकडेच तिने 'राजश्री मराठी'ला (Entertainment) मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला. 'तीन अबॉर्शन' झालं असल्याचं अभिनेत्रीने मुलाखतीत सांगितलं.  अभिनेत्रीने कोण कोणत्या गोष्टींचा खुलासा केला, पाहूयात.

मुलाखतीत स्वाती देवल म्हणाली की, ' लग्नाच्या वर्षभरातच मला दिवस गेले. पण त्यावेळेस एक प्रॉब्लेम झाला होता.  खूप आतली गोष्ट आहे. सातव्या महिन्यात मला डिलिव्हरी करावी लागली, कारण बाळात थोडा प्रॉब्लेम झाला होता.  त्यावेळेस मी 'रेतीवाला' या गाण्याचं शूटिंग करत होते. गाण्याच्या शूटच्या वेळेस मी खूप उड्या वगैरे मारल्या. डान्स केला होता.  त्याचा त्रास झाला  होता.  शारीरिक वेदना झाल्या. मानसिक खच्चीकरण झालं.  काम मिळत नव्हतं.  तो काळ खूप भयंकर होता. तेव्हा असं वाटलं की, सगळं सोडावं.  मुल बाळ झाल्यानंतर छान नोकरी करावी. अजून आपलं वय झालेलं नाही', असं स्वाती म्हणाली.

स्वातीने आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत खुलासा केला (Swati Deval reveals she went through three abortions)

'आयुष्यात बरेच चढ उतारांचा सामना केला. पहिलं, दुसरं मग तिसरंही अबॉर्शन झालं होतं. अबॉर्शनची प्रोसेस खूप वाईट होती.  पहिल्या प्रेग्नेंसीच्यावेळेस कळालं की, प्रॉब्लेम आहे. तेव्हा माझा नवरा तुषार देवल 'कॉमेडी एक्सप्रेस' करत होता.  त्यावेळेला तुषार वॉटर किंग्डमला शूटसाठी गेला होता. मी सगळं एकटीने सांभाळलं.  मग तुषारला कसं सांगायचं, असा प्रश्न पडला होता. कारण मला खूप वाईट वाटलं होतं.  माझं मी सगळं केलं. दुसऱ्या अबॉर्शनच्या वेळेसही मी एकटी होते घरात.  दुसऱ्यावेळेसही तुषार शूटिंगमध्ये व्यस्त होता.  तेव्हा मी घरच्यांना बोलावून घेतलं. तिन्ही वेळेस तुषार नव्हता.  तुषार शूटिंगमध्ये होता. त्याची यात चूक नाही, तो मला म्हणायचा की येऊ का?  पण त्याला येता आलं नाही'.

'तिसऱ्या वेळेस तुषार रडला होता. तिसऱ्या अबॉर्शनंतर माझ्या मनात प्रेग्नेंसीविषयी भीती बसली होती.  तुषार रडला होता, त्याला बाळाची खूप इच्छा होती.  मलाही मुलं प्रचंड आवडतात.  परत चान्स घेणार पण इतक्यात नाही, असं मी ठरवलं. मी कामात लक्ष दिलं.  आतापर्यंत मी जे काही निर्णय घेतले, ते तुषारच्या विचाराने आणि तुषारसाठीच घेतले', असं स्वाती मुलाखतीत म्हणाली. यावेळी स्वाती भावुक झाली असल्याचंही पाहायला मिळालं. 'मला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत काम करण्याचीही संधी मिळाली होती. मंदारचा मला फोन आला होता. तेव्हा मी 'कळक नकळत' करत होते. त्याने माझं सुचवलं. पण मी तिथे पोहचू शकले नाही. हे काम सोडून मला जाता आलं नाही', असंही स्वाती म्हणाली.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

हातात गन, अंगावर रक्ताचे डाग अन् सोबत 'गांधी'; रांगड्या प्रभासच्या 'फौजी'चा अंगावर काटा आणणारा फर्स्ट लूक रिलीज

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Singer Soraya Nieto: भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
भयंकर घडलं; लाईव्ह शोदरम्यान गायिकेवर प्राणघातक हल्ला, थेट काचेची बाटली फेकली; चेहऱ्यावर जखम, टाकेही घालावे लागले
Ram Kadam On Tukaram Mundhe FDA Action On Pan Masala Ad: 'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
'शाहरुख खान असो व अजय देवगण, कारवाई तर होणारच!' तुकाराम मुंढेंच्या FDAने नोटीस पाठवताच भाजप आमदाराची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले ' नैतिकता म्हणून..'
Swati Deval on Abortions: 'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
'पहिलं, दुसरं अन् तिसरंही अबॉर्शन’; ‘आम्ही सातपुते’ फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, भावुक होत म्हणाली, ‘तेव्हा माझा नवरा...’
OTT trending Movie: OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
OTT वर धुमाकुळ घालतेय 2 तास 35 मिनिटांचा रोमँटिक सिनेमा; Imdbवर दमदार रेटिंग, Must Watch
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget