एक्स्प्लोर

Riteish Deshmukh On Marathi Film Industry: 'महाराष्ट्रातच मराठीला दुसरं स्थान...'; रितेश देशमुखनं बोलून दाखवली खंत, विलासरावांची इच्छा सांगताना म्हणाला...

Riteish Deshmukh On Marathi Film Industry: मराठी सिनेमे मागे पडण्याचं खरं कारण हिंदी आणि मराठी सिनेमामधील आर्थिक तुलना, असंही रितेश देशमुख म्हणाला.

Riteish Deshmukh On Marathi Film Industry: सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं अनेक कलाकारांनी छाप सोडलीय, त्यानंतर अभिनयाच्या जोडीला अनेकांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचा मार्ग अवलंबलाय. त्यापैकी एक नाव म्हणजे, महाराष्ट्राचा भाऊ रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh). बॉलिवूडमध्ये (Bollywood News) आपल्या नावा ठसा उमटवणारं मराठमोळं नाव. वडील कुशल राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असूनही रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) आपला वेगळा मार्ग निवडला आणि सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बॉलिवूड आणि नंतर मराठी सिनेसृष्टीतही (Marathi Film Industry) रितेश देशमुख काम करतोय. अभिनय, दिग्दर्शन, निर्माता आणि आता 'बिग बॉस मराठी' सारख्या महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेल्या गाजलेल्या रिअॅलिटीशोचं सुत्रसंचालन यांसारख्या जबाबदाऱ्या रितेशनं अगदी दमदाररित्या हाताळल्या आहेत. रितेशनं मराठी सिनेसृष्टीसाठीही खूप कामं केली आहेत. जेवढा तो आपल्या दमदार भूमिका आणि अभिनयासाठी ओळखला जातो, तेवढाच तो आपल्या स्पष्ट आणि परखड मतांसाठीही ओळखला जातो. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना रितेशनं महाराष्ट्रातच मराठी सिनेमांकडे (Marathi Movies) पाठ फिरवली जात असल्याची खंत बोलून दाखवली. 

मुंबईत समाजवादी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'व्हिजन इंडिया' या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख उपस्थित राहिलेला. याच कार्यक्रमात बोलताना रितेशनं मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूड यामध्ये होणाऱ्या तुलनेवर स्पष्ट भाष्य केलं. तसेच, एका मराठी माणसानं महाराष्ट्रातच सिनेसृष्टीची सुरुवात करूनदेखील मराठी सिनेमा मागे आणि हिंदी सिनेमा पुढे का आहे? यावरही रितेश देशमुखनं आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. 

मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला? 

अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की,"सिनेसृष्टीचा जन्म महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत झाला आणि एका मराठी माणसानं, म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी 100 वर्षांपूर्वी त्याची सुरुवात केली. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही, पण महाराष्ट्रात मराठी सिनेमाकडे दुर्लक्ष होतय... देशाच्या विविध भागांतून लोक इथे आले आणि त्यांनी हा प्रवास आपलासा केला, म्हणूनच मुंबई हे चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र बनलं".

रितेश म्हणाला की, कर्नाटक किंवा केरळमध्ये तिथल्या स्थानिक चित्रपटांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. महाराष्ट्रात 10 ते 11 कोटी लोक मराठी बोलतात, ही संख्या काही दाक्षिणात्य राज्यांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तरीही तिथे प्रादेशिक सिनेमा जसा जोमानं व्यवसाय करतो, तसा तो महाराष्ट्रात करत नाही. आपल्याकडे प्रेक्षकांची पहिली पसंती हिंदी असते, गेल्या काही वर्षापासून तर ती अधिकच होत चालली आहे."

"मराठी सिनेमे मागे पडण्याचं खरं कारण हिंदी आणि मराठी सिनेमामधील आर्थिक तुलना..."

पुढे बोलताना रितेशनं मराठी सिनेमा मागे पडण्याचं कारणंही सांगितलं, तो म्हणाला की, मराठी सिनेमे मागे पडण्याचं खरं कारण हिंदी आणि मराठी सिनेमामधील आर्थिक तुलना. मराठी सिनेमे 3 ते 7 कोटींमध्ये बनवले जातात. पण हिंदी सिनेमा करायचा म्हटलं तर, त्यासाठी 100 कोटी रुपये लागतात. त्यामुळे सहाजिकच एकाच दरात भव्य हिंदी सिनेमा पाहण्याचा पर्यात उपलब्ध असल्यानं प्रेक्षक तिकडे वळतात..."

रितेश देशमुखनं कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्याचे वडील विलासराव देशमुखांची एक इच्छाही बोलून दाखवली. रितेशनं सांगितलं की, "मी जेव्हा निर्मिती क्षेत्रात आलो, तेव्हा माझे वडील म्हणाले होते की, तू हिंदीत काम करतोस, पण मराठी सिनेमासाठी काय करतोयस? म्हणूनच माझ्या कंपनीनं सहा चित्रपट बनवले, ते सुद्धा सगळे मराठीत... आपल्या प्रदेशातील कथा आपल्याच लोकांसाठी मोठ्या पडद्यावर मांडणे ही आपली जबाबदारी आहे..."

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Siddharth Jadhav Marathi Play Animal: सिद्धार्थ जाधवचं आठ वर्षांनी रंगमंचावर दणक्यात पुनरागमन; 'ॲनिमल'मध्ये साकारणार दुहेरी भूमिका

महत्त्वाच्या बातम्या

Marathi Thriller Movie: जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
जंगलातला थरार आणि माओवाद्यांचा जीवघेणा खेळ, जितेंद्र जोशीचा 2 तास 6 मिनिटांचा स्लो-बर्न थ्रिलर; Must Watch 
Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Mallika Sherawat: 21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
21व्या वर्षी घरच्यांचा विरोधात जाऊन लग्न नंतर घटस्फोट; नाव बदलून बॉलिवूडमध्ये एन्ट्री, हरियाणाची 'छोरी' कशी बनली चाहत्यांची ‘मल्लिका’?
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget