एक्स्प्लोर

Honey Singh Accused: यो यो हनी सिंहच्या अडचणीत वाढ, पत्नीची तक्रार, कोर्ट म्हणाले, कुणीही कायद्याच्या वर नाही 

प्रसिद्ध पॉप सिंगर, गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळख असलेल्या यो यो हनी सिंह (Yo Yo Honey Singh )उर्फ ​​ह्दयेश सिंग याच्या विरोधात पत्नी शालिनी तलवार यांनी तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : प्रसिद्ध पॉप सिंगर, गीतकार आणि संगीतकार म्हणून ओळख असलेल्या यो यो हनी सिंह उर्फ ​​ह्दयेश सिंग याच्या विरोधात पत्नी शालिनी तलवार यांनी तक्रार दाखल केलीय. वकिलांद्वारे शालिनी यांनी घरगुती हिंसा आणि इतर हिंसाचाराविरोधात दिल्लीतील तीस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे.

आज दिल्ली कोर्टात या प्रकरणावर सुनावणी झाली. यावेळी हनी सिंहच्या वकिलाने त्याची तब्येत बिघडल्याचं सांगत अनुपस्थितीबाबत कळवलं. तसंच कोर्टाला आश्वासन दिलं की पुढील सुनावणीच्या वेळी तो तारखेला हजर होईल.यावर दिल्ली न्यायालयाने त्यांच्याकडे वैद्यकीय अहवाल मागितला आणि यो यो हनी सिंहचे आयकर विवरण देखील मागितलं. तसंच 'कोणीही कायद्याच्या वर नाही' असं देखील म्हटलं. यावर हनी सिंहच्या वकिलांनी लवकरात लवकर वैद्यकीय नोंदी आणि आयकर विवरणपत्र दाखल केलं जाईल असं सांगितलं. 

काय आहे प्रकरण 
यो यो हनी सिंग उर्फ ​​ह्दयेश सिंग याच्या विरोधात पत्नी शालिनी तलवार यांनी तक्रार दाखल केलीय. वकिलांद्वारे शालिनी यांनी घरगुती हिंसा आणि इतर हिंसाचाराविरोधात दिल्लीतील तिस हजारी कोर्टात तक्रार दाखल केली आहे. शालिनी सिंगच्या याचिकेवर दिल्लीच्या तीस हजारी कोर्टाने हनी सिंगच्या विरोधात नोटीस जारी करुन 28 ऑगस्टपर्यंत पत्नीने लावलेल्या सर्व आरोपांना उत्तर देण्यास बजावले होते. 

घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या या याचिकेत शालिनी सिंग यांनी पती हनी सिंगवर घरगुती हिंसा, लैंगिक हिंसा, मानसिक छळ आणि तिच्यासोबत आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. अशा स्थितीत न्यायालयाने दोघांच्या संयुक्त मालकीच्या मालमत्ता विकण्यासंदर्भात निर्देश जारी करताना हनी सिंगला अशा मालमत्तांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. 

हिंदी पंजाबी गायक हनी सिंग 2011 मध्ये रिलीज झालेल्या 'कॉकटेल' चित्रपटातील 'इंग्लिश बीट' या गाण्याने देशभरात प्रसिद्ध झाला, त्यानंतर त्याने अनेक हिट गाणी गाऊन हिंदी श्रोत्यांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. 'आज ब्लू है पानी पानी' आणि शाहरुख खान-दीपिका पदुकोणवर चित्रीत केलेले 'चेन्नई एक्सप्रेस' मधील 'लुंगी डान्स' हे त्यांनी गायलेले गाणेही सुपरहिट ठरले. 38 वर्षीय हनी सिंगने 2011 मध्ये शालिनी तलवारशी लग्न केले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget