हॉर्न ओके प्लीज ते मी टू ते माझ्या जीवाला धोका, तब्बल 17 वर्षापासून वादाच्या ठिणग्या; तनुश्री दत्ता आणि नाना पटेकरांमध्ये वादाची ठिणगी कशी पडली?
Tanushree Dutta and Nana Patekar: तनुश्रीने पुन्हा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत या वादाला नवे वळण दिले आहे. तनुश्रीने सांगितले की, तिचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पातळीवर छळ केला जात आहे.

Tanushree Dutta On Nana Patekar: बॉलीवूडमध्ये 2018 साली #MeToo चळवळीला सुरुवात झाली आणि त्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने गती देणारे प्रकरण म्हणजे अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी नाना पाटेकर यांच्यावर (Tanushree Dutta and Nana Patekar) लावलेले लैंगिक छळाचे आरोप. मात्र, या प्रकरणाची मुळे 2018 मध्ये नाही तर 2018 मध्ये आहेत, जेव्हा "हॉर्न ओके प्लीज" या चित्रपटाच्या सेटवर तनुश्री यांनी नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. तनुश्रीच्या म्हणण्यानुसार, त्या गाण्यात त्यांचा सोलो डान्स होता. पण नानांनी अनावश्यकपणे सेटवर येऊन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कोरिओग्राफीमध्ये बदल घडवून आणून शरीरसंपर्काचे डान्स स्टेप्स लावले, जे मूळ संकल्पनेचा भाग नव्हते. तनुश्रीने विरोध केल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. उलट सेटवरून बाहेर पडावे लागले.
ठोस पुरावा नसल्याचे सांगत नानांना क्लीन चिट
या प्रकरणावर 2008 मध्ये सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन (CINTAA) कडे तक्रार केली गेली होती. पण संघटनेने ही बाब पोलिसांच्या अधिकारक्षेत्रातील आहे असे सांगून तक्रार नाकारली. मात्र, 2018 मध्ये तनुश्रीने या मुद्द्यावर पुन्हा आवाज उठवला आणि त्यातूनच भारतात #MeToo चळवळीची ठिणगी पेटली. बॉलिवूडमधील अनेक महिला कलाकारांनी यानंतर आपल्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलायला सुरुवात केली. तनुश्रीने पुन्हा तक्रार दाखल केली आणि नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य, दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समी सिद्धिकी यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. पण 2019 मध्ये मुंबई पोलिसांनी यामध्ये कोणताही ठोस पुरावा नसल्याचे सांगून नानांना क्लीन चिट दिली.
तनुश्रीने पुन्हा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप केले
हे प्रकरण तिथेच संपले असते, पण 2024-25 मध्ये तनुश्रीने पुन्हा नाना पाटेकर यांच्यावर गंभीर आरोप करत या वादाला नवे वळण दिले. तनुश्रीने सांगितले की, तिचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक पातळीवर छळ केला जात आहे. काही अज्ञात व्यक्ती त्यांच्या घरात येतात, नोकर चोरी करतात, दरवाज्यावर आवाज करतात, आणि विष दिल्याचा देखील संशय आहे. यामुळे ती क्रॉनिक फॅटिग सिंड्रोम (CFS) या आजाराने ग्रस्त आहे. या गंभीर आरोपांवर नाना पाटेकर यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नसली, तरी तनुश्रीने हा लढा थांबवलेला नाही. तिने सांगितले की, हा केवळ नानाच्या विरोधात लढा नाही, तर संपूर्ण व्यवस्थेतील स्त्रीविरोधी मानसिकतेविरुद्धचा संघर्ष आहे.
इतर महत्वाच्या बातम्या


















