Beast : बीस्ट चित्रपट पाहिल्यानंतर नाराज झाले विजय थलापतीचे वडील; दिग्दर्शकाला म्हणाले, 'चित्रपटाची निर्मीती करण्याआधी...'
बीस्ट (Beast) या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
Beast : दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. सध्या केजीएफ चॅप्टर-2 आणि बीस्ट (Beast) हे चित्रपट चर्चेत आहेत. काही देशांमध्ये बीस्ट या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली आहे. या चित्रपटाबद्दल आता अभिनेता विजय थलापतीच्या (Thalapathy Vijay) वडिलांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
विजय थलापती या अभिनेत्यानं बीस्ट चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली. विजय थलापतीचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे चित्रपट निर्माते आहेत. त्यांनी बीस्ट चित्रपटाचे दिग्दर्शक नेल्सन दिलीप कुमार यांच्या कामाला नापसंती दर्शवली आहे. एका मुलाखतीमध्ये या चित्रपटाबद्दल सांगताना ते म्हणाले, 'या चित्रपटाचा स्क्रिन- प्ले हा अजिबात चांगला नाहिये. दिग्दर्शकानं चित्रपटाबद्दल गंभीर विचार केलेला दिसत नाही.'
त्यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाबद्दल सांगितलं की, दिग्दर्कानं गंभीर विषयावर आधारित असलेल्या चित्रपटाची निर्मीती करतना पूर्ण रिसर्च करावा.' या चित्रपटामध्ये विजय थलापतीनं रॉ एजंटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटानं 200 कोटींची कमाई केली आहे. एस. ए. चंद्रशेखर यांच्या मते, हा चित्रपट केवळ फाइट मास्टर, डान्स मास्टर, एडिटर आणि हीरो या कारणांमुळे बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे.
रिपोर्टनुसार, अभिनेते रजनीकांत यांनी देखील हा चित्रपट पाहिला पण त्यांना नेल्सनचे दिग्दर्शन आवडले नाही. नेल्सन हा रजनीकांत यांच्या Thalaivar 169 या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार होता. पण रिपोर्टनुसार, आता रजनीकांत यांच्या या चित्रपटाचं दिग्दर्शन दुसरा दिग्दर्शक करणार आहे.
हेही वाचा :