एक्स्प्लोर

Vijay Patwardhan On Mandar Devasthali: 'तीन लाखांचा चेक दिला, बाऊन्स झाला, फोन केला, पण...'; प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळींनी पैसे थकवल्याचा मराठी अभिनेत्याचा आरोप

Vijay Patwardhan On Mandar Devasthali: प्रसिद्ध मराठी अभिनेत्यानं 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले आहेत.

Vijay Patwardhan On Mandar Devasthali: मराठी दिग्दर्शकानं (Marathi Director) 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्यावर सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करुन पैसे थकवल्याचे गंभीर आरोप केले आहेत. त्यापाठोपाठ मराठी अभिनेते विजय पटवर्धन (Vijay Patwardhan) यांनीही मालिका संपल्यानंतर मला चेक दिला, पण तो बाऊन्स झाला, त्यानंतर आजपर्यंत माझे पैसे मिळालेले नाहीत, अशी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यानंतर 'हे मन बावरे' (He Man Baware) मालिकेशी जोडलेल्या अनेक कलाकारांनी आणि तंत्रज्ञानांनी आमचेही पैसे मिळालेले नाही, असा सूर आळवला आहे. 

विजय पटवर्धन यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय? 

सुखाच्या सरींनी ……हे मन बावरे!!! ही लोकप्रिय मालिका बंद होऊन, आता जवळपास पाच ते सहा वर्ष झाली. पण,माझ्या कामाचे पैसे अजूनही मिळाले नाही आहेत. इतकी वर्ष वाट पाहून आता नाईलाजाने मला व्यक्त व्हावे लागत आहे.

मी मंदार देवस्थळी, यांच्या टीम वर्क अल्ट्रा क्रिएशन निर्मित हे मन बावरे या मालिकेमध्ये, नायिकेच्या म्हणजेच मृणाल दुसानीस ,हिच्या भावाची, 'सुनीलची' भूमिका केली. चित्रीकरणाच्या दरम्यान वेळ काळ न बघता, प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि जीव तोडून काम केले. पुण्यात असताना तातडीने शुटिंगला बोलावल्यावर  लगेच मुंबईला  गेलो आहे.  कोविड काळातही बंधने शिथिल झाल्यावर मालिकेत काम केलं. मालिका संपल्यानंतर या मालिकेचा एक पैसाही मला मिळालेला नाही. पॅकअपच्या वेळेला मला काही रकमेचा जळपास 3 लाखाचा चेक देण्यात आला होता. पण तो भरल्यावर बाऊन्स झाला. त्या बद्दल विचारणा केली तेव्हा एका आठवड्यात फोन करतो असं सांगण्यात आलं. पण आजतागायत फोन आला नाही. एक उत्तम दिग्दर्शक आणि मित्र असल्यामुळे माझ्यासकट बऱ्याच जणांनी काही कंप्लेंट केली नाही किंवा कुठेही वाच्यता केली नाही. पण आता पाणी डोक्यावरून जायला लागल्यानं  हे लिहावं लागलं. बायकोच्या कॅन्सर ट्रीटमेंट साठी पैसे हवे होते त्यासाठी फोन केला, तो पण उचलण्यात आला नाही.

काही कलाकारांना त्यांचे पेमेंट मिळाले पण काहींना नाही मिळाले, अनेक वेळेला फोन केला पण उचलला गेला नाही. प्रत्यक्ष भेट झाल्यावरही काही विषयही  काढला गेला नाही. आम्ही प्रत्येक वेळी समजून घेतलं, नेहमीच सपोर्ट केला, पण आम्हाला फक्त तारखा आणि आश्वासनं मिळत गेली.

मंदार खूप उत्तम दिग्दर्शक आहे. त्याच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेम आहे आणि राहीलही. म्हणूनच इतके दिवस गप्पं होतो. पण आता त्याच गोष्टींचा विचार करून खूप मानसिक त्रास होतोय.

मंदार, हे सगळं इथे शेअर करतोय, कारण इतके दिवस मी तुझ्या अडचणी समजून घेतल्या. पण, आता माझ्याही काही अडचणी आहेत. ज्यातून मार्ग काढणं अवघड जातं आहे. माझ्या अडचणी तू समजून घ्याव्यास. एकदा माझ्या बाजूनेही विचार कर.  मला कुणालाही दोष द्यायचा नाहीये. पण इतकी वर्ष वाट पाहूनही न्याय/पैसे न मिळणं कोणासाठीही खुप त्रासदायक आहे. आणि ह्या सगळ्यांत माझं काय चुकलं.?

तू ज्या अडचणीत आहेस अशी वेळ कुणावरही कधीच येऊ नये. लवकरच तू याच्यातून बाहेर पडावास माझ्यासारखे अनेक लोकांचे पैसे अडकले आहेत, ते लवकर मिळावे ही ईश्वरचरणी प्रार्थना.

मंदार, तू लवकर ह्या सगळ्यांतून बाहेर पडावं आणि पुन्हा पहिल्यासारखं जोमाने आणि जबरदस्त काम करावं हिच सदिच्छा..
धन्यवाद  

(तुझ्याबद्दलचा आदर म्हणून इतके दिवस कधी बोललो नाही. पण, आज मला व्यक्तं व्हावंसं वाटलं . चूकभूल माफ. मला लाईक्स आणि सहानुभूती मिळावी म्हणून मी हे लिहिलं नाहीये. ज्यांना असा अनुभव आला आहे, त्यांना माझं म्हणणं आणि माझी अडचण कळेल)

अभिनेते विजय पटवर्धन यांनी पोस्ट केल्यानंतर त्या पोस्टवर मालिकेतील मुख्य अभिनेता शशांक केतकरनं कमेंट करुन आपलंही समर्थन दिलं आहे. मंदार देवस्थळींनी निर्माता म्हणून आपली फसवणूक केल्याचं त्याने म्हटलं आहे.

विजय पटवर्धनांच्या पोस्टवर केलेल्या कमेंटमध्ये शशांक केतकर काय म्हणाला? 

Vijay Patwardhan Amit Chhallare Jayaant Pawar आपली आणि अनेक कलाकारांची अवस्था same आहे!!!!!! प्रत्येकाची amount लाखातच आहे. आपली मालिका संपल्या नंतर, काही महिने वाट पाहिल्यावर मी, शर्मिष्ठा आणि मृणाल ने social media वर या बद्दल वाच्यता केली.. खंत व्यक्त केली. ज्याला उत्तर म्हणून मंदार दादानी TV वर interview दिला की पुढच्या 6 महिन्यात मी सगळ्यांचे पैसे देईन. तो interview आजही yourube वर आहे! या गोष्टीलाही आता 5 वर्ष उलटून गेली. तो उत्तम दिग्दर्शक आहे यात तिळमात्र शंका नाही पण त्याच मालिकेचा निर्माता म्हणून त्याने आपल्या सगळ्यांना फसवले आहे.

Vijay Patwardhan On Mandar Devasthali: 'तीन लाखांचा चेक दिला, बाऊन्स झाला, फोन केला, पण...'; प्रसिद्ध दिग्दर्शक मंदार देवस्थळींनी पैसे थकवल्याचा मराठी अभिनेत्याचा आरोप

आपण या संदर्भात वाहिनीला एक पत्र सुध्दा लिहिले होते! आठवतय ना ? त्याचाही परिणाम झाला नाही. वाहिनी ने त्याला payment केले आणि त्या पैशाचं त्यानी पुढे काय केलं याचं उत्तर आज तागायत त्यानी दिलेले नाही!!!!!!

industry मधले काही कलाकार मित्र आपलीच अक्कल काढत होते तेव्हा… तुम्ही support केला पाहिजे निर्मात्याला… त्याने तुम्हाला संधी दिली आणि तुम्ही त्याच्या मागे लागला आहात पैशा साठी!??? वगैरे वगैरे!!! त्या सगळ्या support करणाऱ्या कलाकारांना मला इतकंच सांगायचंय… नुसता शब्दात support देऊ नका मग मंदार दादाला … तुमच्या account मधून प्रत्येकाने 5 लाख द्या त्याला… मग ती काही कोटीतली amount त्याच्या कडे जमेल आणि तो आमचे देऊ शकेल! हा खरा support.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'संयम ठेवला, पण अजूनही माझे 6,70,151 रुपये थकवलेत...'; 'वादळवाट' फेम दिग्दर्शक मंदार देवस्थळींवर गंभीर आरोप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget