Vicky Kaushal Movie Chhaava Gets UA Certificate: 3 कट्स, 7 बदल अन् 161 मिनटं 50 सेकंदांचा सर्टिफाईड रनटाईम; 'छावा'वर सेन्सॉरची कात्री
Vicky Kaushal Movie Chhaava Gets UA Certificate: विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तीन दिवस आधी, सेन्सॉर बोर्डाने त्याच्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे.

Vicky Kaushal Movie Chhaava Gets UA Certificate: विक्की कौशलचा (Vicky Kaushal) बहुप्रतिक्षित 'छावा' (Chhaava Movie) येत्या 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे. अशातच रिलीज डेट अगदी तोंडावर येऊन ठेपलेल्या 'छावा'ला सेन्सॉर बोर्डानं तीन कट आणि सात बदलांसह UA प्रमाणपत्र दिलं आहे. एका ऑडियो-टेक्स्ट डिस्क्लेमरमध्ये म्हटलं आहे की, हा चित्रपट शिवाजी सावंत यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे. या चित्रपटाचा हेतू कोणत्याही ऐतिहासिक वस्तुस्थितीची बदनामी करणं, त्यांचा अपमान करणं, चुकीचं चित्रण करणं किंवा विकृत करणं नाही, तसेच कोणत्याही व्यक्तीच्या किंवा समुदायाच्या भावना दुखावण्याचा किंवा त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न करत नाही.
या चित्रपटाचा उद्देश छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करणं, त्यांच्या ज्ञानाचं, शौर्याचं आणि इतिहासातील त्यांच्या चिरस्थायी योगदानाचं दर्शन घडवणं आहे. औरंगजेबाची काही वाक्य जसं की, "खून तो आखिरी मुगलों का', बदलण्यात आली आहेत. याशिवाय काही अपशब्दही काढून टाकण्यात आले आहेत. हा चित्रपट 2 तास 42 मिनिटं चालणार असून 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
सेन्सॉरनं चालवली कात्री...
सेंन्सॉर बोर्डानं काही डायलॉग्स आणि सीन्स बदलण्यासोबतच काही शब्द म्यूट करण्याची रिक्वेस्ट केली आहे. बॉलिवूड हंगामानं दिलेल्या रिपोर्टनुसार, काही शब्द म्यूट करायला सांगितले आहेत. याव्यतिरिक्त 'मुगल सल्तनत का जहर' या डायलॉगला "उस समय, कई शासक और सल्तनत खुद को जिंदा रखने की कोशिश कर रहे थे.", असं बदलून घेण्यास सांगितलं होतं. 'खून तो आखिर मुगलों का ही है' हा डायलॉग बदलून 'खून तो है औरंग का ही' मध्ये बदलून घेण्यास सांगितलं आहे.
यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकलेला 'छावा'
ट्रेलर रिलीज झाल्यानंतरही 'छावा'मध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवरुन तणाव निर्माण झाला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्मात्यांना इतिहासाशी कोणत्याही प्रकारे छेडछाड करू नका असा सल्ला दिला होता. या दृश्यात, छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या राज्याभिषेकानंतर राणी येसूबाईंसोबत लेझीम खेळतानाची दृश्य दाखवण्यात आली होती. जी काढून टाकण्याची मागणी करण्यात आली होती. दिग्दर्शकांनी, निर्मात्यांनी प्रेक्षकांची मागणी मान्य करत, लगेचच बदल करण्यास सकारात्मकता दाखवली आणि बदल केले जातील, असा शब्द दिला.
सीबीएफसी वेबसाइटनुसार, 'छावा' सिनेमा 1 फेब्रुवारी 2025 रोजी अधिकृतपणे सर्टिफाइड करण्यात आला आहे. या चित्रपटाला 'UA 16+' रेटिंग देण्यात आलं आहे आणि त्याचा सर्टिफाइड रनटाइम 161 मिनटं आणि 50 सेकंद आहे, जो 2 तास, 41 मिनिटं आणि 50 सेकंदांच्या बरोबरीत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























