Chalapathi Rao Death : दाक्षिनात्य ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन; 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Chalapathi Rao Death : तेलगू चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते चलपती राव यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
Chalapathi Rao Death : तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेते चलपती राव (Chalapathi Rao) यांचे काल रात्री (शनिवारी) निधन झाले. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या कटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
कौटुंबिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेते चलपती राव यांना अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्या होत्या. चलपती राव यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे तर, त्यांना दोन मुलं आहेत. वाढत्या वयामुळे ते हळूहळू चित्रपटसृष्टीपासून दूर जात होते. मात्र, आपल्या दमदरा अभिनयाने त्यांनी अनेकांच्या हृदयावर राज्य केले.
'या' चित्रपटांमध्ये काम केलं होतं
चलपती राव यांच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, चलपती राव यांनी 600 हून अधिक चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. टॉलीवूड चित्रपटसृष्टीला त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले होते. त्याच वेळी, राव यांनी एनटी रामाराव, कृष्णा, अक्किनेनी नागार्जुन, चिरंजीवी आणि व्यंकटेश यांच्या चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता आणि खलनायक म्हणून अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले होते.
'या' कलाकारांनी व्यक्त केला शोक
अभिनेते पवन कल्याण (Pawan Kalyan) यांनी राव यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. यानंतर निर्माते डी. सुरेश यांनी चलपती राव यांच्या कुटुंबियांना भेट दिली. ते म्हणाले, "आमच्यातील अनेक लोक आपल्यापासून दूर जात आहेत ही अत्यंत दुःखाची बाब आहे." चलपती राव यांचा मुलगा रवी बाबू देखील टॉलीवूडमधील एक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत.
Senior actor Shri #ChalapathiRao (79) garu passed away due to cardiac arrest.
— Gopal Karneedi (@gopal_karneedi) December 25, 2022
May his soul rest in peace 🙏 pic.twitter.com/DRpinZGUw7
'या' बॉलिवूड चित्रपटांतदेखील काम केले होते
टॉलीवूड फिल्म इंडस्ट्री व्यतिरिक्त चलपती राव यांनी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत देखील काम केले होते. त्यांनी सुपरस्टार सलमान खानबरोबर ‘किक’ चित्रपटात काम केले होते. राव हे "यमगोला", "युगपुरुषुडू", "न्याय चौधरी", "बोबिली पुली", "निन्ने पेल्लादता" आणि "अल्लारी" यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जात होते.
महत्त्वाच्या बातम्या :
Main Atal Hoon : राजकारणी, पंतप्रधान, कवी...; 'मैं अटल हूँ' सिनेमातील पंकज त्रिपाठींचा लूक आऊट