एक्स्प्लोर

भर कार्यक्रमात तब्येत बिघडली, रुग्णालयात नेताच सुप्रसिद्ध गायिकेचं निधन; ब्रेन स्ट्रोकमुळे घेतला अखेरचा श्वास

Geeta Patnaik Declared Brain Dead: ज्येष्ठ ओडिया गायिका गीता पटनायक यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन. मनोरंजनसृष्टीत शोककळा.

Singer Geeta Patnaik Declared Brain Dead Death: सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.   ओडिया संगीतातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध  आवाज गीता पटनायक यांचे निधन झाले आहे.  वयाच्या 73 वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  कटकमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.  मात्र, त्यांची रुग्णालयातच प्राणज्योत मालवली.     पटनायक यांच्या कुटुंबातील सदस्याने  त्यांच्या मृत्यूबाबत अधिकृत माहिती दिली. रविवारी सायंकाळी त्यांच्या निधनाची बातमी समोर आली.  

गीता पटनायक यांच्यासोबत नेमकं काय घडलं?

गुरुवारी एका कार्यक्रमात गीता पटनायक सहभागी झाल्या होत्या.  त्याच कार्यक्रमात त्यांची अचानक तब्येत बिघडली. त्यांना तातडीने कटकमधील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.  चाचणी केली  असता, त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे निदान झाले.  त्यानंतर त्यांना कटकमधील  एका खासगी रुग्णालयातील उपचारासाठी पाठवण्यात आले.   गीता यांचे मेहुणे प्रदोष पटनायक यांनी सांगितले की, उपचारादरम्यान, डॉक्टरांनी  रविवारी त्यांचे ब्रेन डेड घोषित केले.  मृत्यू झाल्यानंतर पटनायक कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.  गीता यांचा मृतदेह आज सोमवारी कटक येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येईल. 

गीता पटनायक यांच्या गाण्यांना पसंती

गीता पटनायक यांनी आपल्या कारकि‍र्दीत अनेक कलाकार आणि संगीतकारांसोबत काम केले आहे.   त्यांनी आजवर अनेक लोकप्रिय  ओडीया गाण्यांना आपला आवाज दिला आहे.   त्यांच्या गाण्यांना आजही प्रेक्षकांकडून पसंती मिळते. 

गीता पटनायक यांच्या निधनाबद्दल केवळ संगीत आणि मनोरंजन जगतातूनच नव्हे तर, ओडिशाच्या काही नेत्यांनीही श्रद्धांजली वाहिली.  मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आणि बीजेडी प्रमुख  नवीन पटनायक यांनी गीता पटनायक  यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'प्रसिद्ध गायिका गीता पटनायक यांच्या निधनाची  बातमी ऐकून मला दु:ख झाले आहे.   त्यांच्या निधनानंतर कधीही भरुन न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.  या दु:खाच्यावेळी, मी शोकग्रस्त कुटुंबाप्रति तीव्र संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मी देवाकडे प्रार्थना करतो', असं म्हणत त्यांनी शोक व्यक्त केला.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'गाडी थांबवा, रस्ता ओळखीचा नाही'; गजबजलेल्या मुंबईच्या ओसाड रस्त्यावर अभिनेत्रीला घेऊन गेला रिक्षावाला, भयंकर प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला पण...

'आधी होतं, पण आता आमचे रस्ते मोकळे...'; ब्रेकअपबद्दल सैराट फेम रिंकू राजगुरू पहिल्यांदाच बोलली, जोडीदाराबाबत म्हणाली...

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Priyanka Chopra Reveals Bollywood Actor Secret: 'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'
'एका बॉलिवूड अभिनेत्याचे बऱ्याचजणींसोबत संबंध...'; पती निकसमोरच प्रियांकानं सांगितलं 'बॉलिवूडचं सर्वात मोठं सीक्रेट'
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
'आता बघवत नाहीय' सोनम वांगचुक यांच्या सपोर्टसाठी आख्खं बॉलिवूड एकवटलं! सोनाक्षी सिन्हासह, या सेलिब्रेटींचे सरकारला थेट सवाल
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा
आपण बोललो म्हणजे देशद्रोही ठरत नाही, आता मी आवाज उठवणार, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात मतदान करणाऱ्या नगरसेवकांवर होणार पक्ष शिस्तभंगाची कारवाई
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
Embed widget