Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Govinda Spotted With Rumored Girlfriend Actress: गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा हिनं अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध होते, असा खळबळजनक आरोप अनेकदा केलाय.

Govinda Spotted With Rumored Girlfriend Actress: कधीकाळी आपल्या सुपरहिट सिनेमांच्या जोरावर बॉलिवूडला (Bollywood News) तारणारा, नव्वदच्या दशकातला 'हिरो नंबर 1' म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार अभिनेता म्हणजे, गोविंदा (Govinda). इंडस्ट्रीला एकापेक्षा एक हिट सिनेमे देणारा 'हिरो नंबर 1' गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे भलताच चर्चेत आहे. कधी स्वतःच केलेल्या दाव्यांमुळे, तर कधी त्याची पत्नी सुनीता आहुजा (Sunita Ahuja) हिनं केलेली वक्तव्य त्याच्या पथ्यावर पडली. गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा हिनं अभिनेत्याचे विवाहबाह्य संबंध होते, असा खळबळजनक आरोप अनेकदा केलाय.
सुनीता हिनं नेटफ्लिक्सवरील 'लॉक अप 2' (Lock Upp 2) या रिअॅलिटी शोमध्ये असा दावाही केला होता की, गोविंदाचे अनेक स्त्रियांशी संबंध होते. तरीही, काहीही झालं तरी आपण त्याची साथ कधीच सोडणार नाही, असंही तिनं स्पष्ट केलं होतं. अशातच, गोविंदा नुकताच मुंबई विमानतळावर एका 'मिस्ट्री गर्ल'सोबत दिसला आणि पुन्हा एकदा तो चर्चेत आला. त्याच्यासोबत दिसलेली ती नेमकी कोण? याबाबत चर्चा रंगल्या.
गोविंदासोबत दिसलेली ती 'मिस्ट्री गर्ल' कोण आहे? (Govinda Spotted With Actress)
गोविंदा नुकताच मुंबई विमानतळावर एका तरुणीसोबत दिसला आणि गोविंदासोबत दिसलेली 'ती' कोण अशा चर्चांना उधाण आलं. व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत, गोविंदासोबतची ती कोण? असे प्रश्न अनेकांनी विचारले. तर, गोविंदासोबत स्पॉट झालेली एक नवोदित अभिनेत्री आहे. तिचं नाव कोमल राणी स्वर्णकार (Komal Rani Swarnkar). सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं गोविंदा आणि कोमल यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी गोविंदानं काळी डेनिम जीन्स, पांढरा शर्ट आणि काळं जॅकेट वेअर केलेलं, तर कोमल पांढऱ्या रंगाच्या आउटफिट्समध्ये दिसली. असा दावा केला जात आहे की, ही तीच मराठी अभिनेत्री आहे, जिच्यासोबत गोविंदाचं अफेअर असल्याच्या चर्चा आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, गोविंदा आणि कोमल स्वर्णकार यांच्या अफेअरच्या चर्चा सुरू आहेत. आम्ही याबाबत कोणताही अधिकृत दावा आम्ही करत नाही. पण, सोशल मीडियावर सध्या अनेकजण गोविंदा आणि कोमल यांच्याबाबत चर्चा करत आहेत.
मला कोमल नावाशी नफरत... : सुनीता अहुजा
सुनीता आहुजा यांनी 2026 मध्ये मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाच्या कथित अफेअरबद्दल प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी सुनीता म्हणाल्या होत्या, "काहीतरी गडबड आहे..." कोमल या नावाबद्दल नाराजी व्यक्त करताना त्या म्हणालेल्या की, "मला या नावाचा द्वेष आहे... एक मुलगी आहे, कोमल XYZ... मला तिचा द्वेष वाटतो. जर मला कोणतेही पुरावे मिळाले तर मी गोविंदाला कधीच माफ करणार नाही..."
कोमल रानी स्वर्णकार आहे तरी कोण? (Who Is )
जर कोमल राणी स्वर्णकारबाबत बोलायचं झालं तर, ग्लॅमर इंडस्ट्रीतला नवा चेहरा म्हणून तिला ओळखलं जातंय. कोमल मूळची उत्तर प्रदेशची. कोमल आणि गोविंदासोबत 'रूपा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. काही दिवसांपूर्वीच गोविंदानं आपला आगामी सिनेमा 'रूपा'ची घोषणा केलेली. तसेच, एका पत्रकार परिषदेत बोलताना कोमलचं कौतुकही केलेलं.
"मी देवाकडे प्रार्थना आणि आशा करतो की, कोमलसोबत पुढेही काम करण्याची संधी मिळो आणि कमीत कमी अर्धा डझन हिट सिनेमे देईन...", असं गोविंदा म्हणालेला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















