एक्स्प्लोर

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

एखाद्या सिनेमाचं नुकसान होऊ नये यासाठी एखाद्या धार्मिक जागेवरून अशा प्रकरचं पाऊल उचलण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल. 

Satluj Movie: दिग्दर्शक हनी त्रेहान यांच्या ‘सतलज’ (Satluj Movie) सिनेमाला रिलीज झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत ओटीटीवरून हा चित्रपट काढून टाकण्यात आला.भारतात सिनेमावर बंदी घातल्यानंतर निर्मात्यांना मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी देश-विदेशातून मदतीचे हात पुढे आले. काही गुरुद्वारांनी निर्मात्यांचं नुकसान पाहून मोठं निर्णय घेतला. देशभरातील गुरुद्वारामध्ये ‘सतलज’च्या मेकर्ससाठी गल्लेही ठेवण्यात आल्याचं समोर आलं. एखाद्या सिनेमाचं नुकसान होऊ नये यासाठी एखाद्या धार्मिक जागेवरून अशा प्रकरचं पाऊल उचलण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.  गल्ल्यात जमा झालेली ही मदत गुरुद्वाराकडून दिग्दर्शक हनी त्रेहान यांना देण्यात आली. मात्र,  यांनी ही आर्थिक मदत स्वीकारण्यास नकार दिला. एक सोशल मीडिया पोस्ट करत त्यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली.

‘सतलज’ला रिलीजच्या 48 तासांतच मोठा धक्का

हनी त्रेहान दिग्दर्शित ‘सतलज’ हा सिनेमा याआधी ‘पंजाब 95’ या नावाने प्रदर्शित होणार होता. मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाची दीर्घकाळ सेन्सॉर बोर्डासोबत चर्चा सुरू होती. अनेक अडचणींनंतर अखेर हा सिनेमा ३ जुलै रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाला.मात्र, रिलीजच्या अवघ्या 48 तासांनंतर ‘सतलज’ला भारतात बॅन करण्यात आलं. भारत सरकारच्या निर्देशानंतर हा सिनेमा स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून हटवण्यात आल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे सिनेमाच्या निर्मात्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागलं.

‘सतलज’साठी गुरुद्वारांमध्ये गल्ले

सिनेमा हटवल्यानंतर ‘सतलज’च्या टीमच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे आले. देश-विदेशातून मेसेज, फोन आणि सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लोकांनी आपला पाठिंबा व्यक्त केला. काहींनी तर सिनेमाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी दर्शवली.हनी त्रेहान यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. अनेक गुरुद्वारांमध्ये ‘सतलज’च्या निर्मात्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी गल्ले ठेवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.“आम्हाला अनेक मेसेज, कॉल, इन्स्टाग्राम डीएम आणि ट्विट्स मिळत आहेत. लोक खालरा कुटुंबीय आणि दिलजीत भाईजी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी लोक आर्थिक मदत देऊ इच्छित आहेत,” असं हनी त्रेहान यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Honey Trehan (@honeytrehan)

लोकांकडून मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल हनी त्रेहान यांनी आभार मानले. मात्र, ‘सतलज’साठी कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत स्वीकारणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.“तुमचं प्रेम आणि साथ आमच्यासाठी पुरेशी आहे. अत्यंत नम्रपणे आम्ही सांगू इच्छितो की, आमच्या सिनेमासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचा पैसा, भेटवस्तू किंवा देणगी स्वीकारू शकत नाही,” असं त्यांनी म्हटलं.हा सिनेमा केवळ एका व्यक्तीची कथा नसून, ज्यांना अंधारात गमावलं त्यांच्या सामूहिक दुःखात सहभागी होण्याचा छोटासा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दिलजीत दोसांझने घेतलं नव्हतं मानधन

‘सतलज’मध्ये अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ यांनी जसवंत सिंह खालरा यांची प्रमुख भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे, या सिनेमात काम करण्यासाठी दिलजीत यांनी कोणतंही मानधन घेतलं नव्हतं.सिनेमाच्या प्रदर्शनापासूनच ‘सतलज’भोवती मोठी चर्चा होती. मात्र, रिलीजच्या अवघ्या दोन दिवसांत सिनेमा हटवल्यामुळे त्याचा पुढील प्रवास थांबला. आता सिनेमासाठी गुरुद्वारांमध्ये गल्ले ठेवण्यात आल्याची बातमी समोर आल्यानंतर पुन्हा एकदा ‘सतलज’ची चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satluj: रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
रिलीजनंतर 48 तासांत हटवला; ‘सतलज’च्या नुकसानभरपाईसाठी गुरुद्वारांनी उचललं मोठं पाऊल! दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत
Dashmi Marathi Movie Poster: महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
महेश मांजरेकर, मकरंद अनासपुरे अन् दाक्षिणात्य स्टार एकाच सिनेमात; सिनेमाचा फर्स्ट लूक पाहिलात?
OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Advertisement

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Embed widget