एक्स्प्लोर

'आधी होतं, पण आता आमचे रस्ते मोकळे...'; ब्रेकअपबद्दल सैराट फेम रिंकू राजगुरू पहिल्यांदाच बोलली, जोडीदाराबाबत म्हणाली...

Sairat Fame Rinku Rajguru Reveals Why She Is Single Now: सैराटमुळे रिंकू राजगुरूला मोठी लोकप्रियता मिळाली. तिने अलिकडेच एका मुलाखतीत प्रेम आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं.

Rinku Rajguru Opens Up About Love, Breakup: 'सैराट' या चित्रपटामुळे रिंकू राजगुरूला रातोरात फेम मिळाली.   सैराट या चित्रपटातील 'आर्ची' या पात्राला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. सैराट या चित्रपटानंतर रिंकूला अनेक चित्रपटातून ऑफर मिळाली.  तिनं कायम संधीचं सोनं केलं. रिंकूचा चाहतावर्गही मोठा आहे.  चाहत्यांसाठी ती कायम फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करते. कामाव्यतिरिक्त रिंकू आपल्या वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते.   सैराट या चित्रपटानंतर तिचं नाव आकाश ठोसरसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, दोघांमध्ये फ्रेंडशिपव्यतिरिक्त कोणतंही नातं नसल्याचं दोघांनी स्पष्ट केलं.  दरम्यान, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं प्रेम आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे.

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत रिंकूनं आपल्या लव्ह लाइफबाबत खुलासा केला आहे.  तिनं प्रेम आणि ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. मुलाखतीदरम्यान तिला, 'तू कायम सिंगल होतीस की  तुझ्या आयुष्यात कुणी आलं होतं?' या प्रश्नावर रिंकू म्हणाली, "आवडणं हे एक असतं.  कधी तरी कुणीतरी आवडलेलं असतं आपल्याला.  हे सगळं आधी होऊन गेलं आहे.  आतापर्यंत कुणाबद्दल प्रेम वाटलं नाही, असं नाही. पण  आता मी सिंगल आयुष्य जगत आहे. आधी होतं, दरम्यान आता आमचे रस्ते मोकळे झाले आहेत, स्वत:साठी....", असं रिंकूने स्पष्ट केलं.

मुलाकडून अपेक्षा काय? या प्रश्नावर रिंकू म्हणाली, "मला जोडीदार हा फॅमिली मॅनसारखा हवा आहे. माझ्या जोडीदाराला कुटुंब महत्त्वाचं असेल, ज्याला माणसाची कदर असेल.  महत्त्वाचं म्हणजे,  तो फक्त आणि फक्त माझा असावा. बाकी मला काही नको", असं रिंकूने स्पष्ट केलं.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

रिंकूसाठी प्रेमाची व्याख्या काय?  या प्रश्नावर रिंकू म्हणाली, "माझा प्रेमावर प्रचंड विश्वास आहे. प्रेम ही  जगातील सुंदर गोष्ट आहे.   पण का कुणास ठाऊक याच प्रेमाची आता मला भीती वाटते आहे. मला असं वाटतं की, प्रेमात आपण इमोशनली इन्व्हॉल्व्ह होतो. आपण त्या माणसावर अवलंबून असतो. आता खरंतर याबद्दल मला भीती वाटते आहे. आजकाल कुणीही कोणत्याही कारणावरून सोडू शकतो. नातं संपुष्टात आणू शकतो. आपल्या आई वडिलांच्या काळात असं नव्हतं.  त्यामुळे आता  माणसांची आणि प्रेमाची खूप भीती वाटते. मी इमोशनल खूप सेन्सिटिव्ह व्यक्ती आहे. मी प्रेम केलं तर आरपार नाही.  नाहीतर मी करत नाही. मला जो मरेपर्यंत, तूच माझी बायको असं म्हणले, त्याच्यासोबत मी राहेन", असं रिंकूने आपल्या मुलाखतीतून स्पष्ट केलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget