एक्स्प्लोर

'गाडी थांबवा, रस्ता ओळखीचा नाही'; गजबजलेल्या मुंबईच्या ओसाड रस्त्यावर अभिनेत्रीला घेऊन गेला रिक्षावाला, भयंकर प्रसंगाचा व्हिडीओ शेअर केला पण...

Priya Bakshi Mumbai auto viral video truth revealed: प्रिया बक्षीचा मुंबईतील रिक्षा वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओत ती रस्ता चुकल्याचा आरोप करताना दिसली.

Actress Priya Bakshi Sparks Debate With Viral Rickshaw Incident Clip: बऱ्याचदा सिनेसृ्ष्टीतून अनेक धक्कादायक किस्से समोर येतात. काही अभिनेत्रींसोबत अनेपक्षित घटना घडतात. या घटना ऐकून आपल्यालाही धक्का बसतो. अशीच एक धक्कादायक घटना मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया बक्षी हिच्यासोबत घडली आहे.  प्रियाने अलिकडेच तिच्यासोबत मुंबईत घडलेल्या प्रसंगाबाबत व्हिडिओद्वारे माहिती दिली. तिनं प्रसंग शेअर केला, पण व्हिडिओच्या शेवटी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तिनं तिचा व्हिडिओ शेअर करुन शेवटी कॅप्शन दिला आहे. कॅप्शनमध्ये तिनं, 'अॅड' आणि 'Collaboration' असे टॅग्स दिले आहेत.  यावरुन ही पोस्ट जाहिरातीचा एक भाग असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिव्हर्सिटी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्रिया बक्षीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे.  हा व्हिडिओ तिनं 14 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या रस्त्यावर चित्रित केला. व्हिडिओमध्ये प्रिया रिक्षात बसलेली दिसत आहे. तसेच ती खूप घाबरलेली दिसत आहे.  व्हिडिओत रिक्षा चालकाला अभिनेत्री वाहन थांबवण्यासाठी सांगत आहे. रस्ता अनोळखी वाटत असल्यामुळे ती ओरडते. मात्र, ड्रायव्हर ऐकत नाही.  तो म्हणतो, आपण योग्य मार्गावरून जात आहोत. ती संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करते. 

ती गुगल मॅपही दाखवते, पण वाहन चालक आपल्या बोलण्यावर ठाम असतो.  प्रिया नंतर ओरडतो. 'ऑटो थांबवा, भाऊ..  नाहीतर मी पोलिसांना बोलावते.  तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात?  मला तुमच्यासोबत जायचं नाही", यानंतर रिक्षा चालक गाडी थाबंवतो आणि प्रियावर भडकतो. "परत इथे येऊ नका. रस्ता तुम्हाला माहीत नाही. हा आमचा परिसर आहे". यानंतर प्रिया ऑटो बाहेर येते आणि ओरडते. "आम्हा उत्तर भारतीयांना कचऱ्यासारखे वागवले जाते.  माझं काम झालं आहे.  मी इथे आता वायफळ बडबड करणार नाही. खरंच...", असं म्हणते आणि निघून जाते. 

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by PRIYA BAKSHI (@priyabakshi_19)

दरम्यान, प्रियासोबत घडलेली ही घटना खरी नसल्याचा अंदाज हॅशटॅगमुळे वर्तवण्यात येत आहे. ही पोस्ट ब्रँड 'कोलॅबोरेशनचा भाग असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की,  'कधीकधी रस्ता हा खरा मुद्दा नसतो. तर, लोक असतात. शहराशी अपरिचित असल्याने, कुणीही कमी दर्जाचे होत नाही. प्रश्न विचारल्याने कुणीही असभ्य होत नाही.  वेगळ्या प्रदेशातून असल्याने कुणीही अनोळखी होत नाही', असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं.

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Jr NTR Bagheera: ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
ज्युनिअर NTRवर दु:खाचा डोंगर; लाडक्या बघीराचं निधन, भावुक पोस्ट शेअर करत म्हणाला...
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
मला कमी संघर्ष करावा लागला, मी करत गेलो आणि लोकांना आवडत गेलं, नाटक चित्रपट ते अभिनय, अशोक सराफ भरभरुन बोलले
Salman Khan Emraan Hashmi: सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?
सलमान खानची 14 वर्षांपूर्वीची भविष्यवाणी ठरली खरी; इम्रान हाश्मीबाबत भाईजान नेमकं काय म्हणाला होता?

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
Girls Students News : राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला 2000 रुपयांचा पॉकेटमनी मिळणार?
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Embed widget