आता माझं वय झालंय. मी कधीही गचकेन, इंडस्ट्रीमध्ये कोणाबद्दल जर चांगलं बोललं गेलं तर...उषा नाडकर्णी सगळंच बोलून निघाल्या
मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून त्या काम करत आहेत .अशातच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मराठी इंडस्ट्री विषयीचे मत मांडलं आहे .

Usha Nadkarni: मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) कायमच आपल्या रोखठोक बोलण्याने चाहत्यांच्या लक्षात राहिल्या आहेत . अनेक चित्रपट मालिकांमधील त्यांचं काम प्रेक्षकांनी आवर्जून पाहिलं आहे . ग्रामीण बाज, ठसकेबाज बोलण्याची पद्धत असणाऱ्या प्रेक्षकांच्या ' आऊ ' पुन्हा एकदा चर्चेत आल्यात त्यांच्या अशाच स्पष्टवक्तेपणामुळे . मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत अनेक वर्षांपासून त्या काम करत आहेत .अशातच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मराठी इंडस्ट्री विषयीचे मत मांडलं आहे . माझं वय झालंय, मी कधीही गचकेन म्हणून त्याच्या आधी बोलून घेते अशी तिखट सुरुवात करत अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी इंडस्ट्रीत काम करतानाच त्यांचं मत स्पष्टपणे मांडलं आहे . (Marathi Entertainment Industry)
Usha Nadkarni: 'आमच्या इंडस्ट्रीमध्ये कोणाचं चांगलं बोललं की.. '
उषा नाडकर्णी म्हणाल्या, आता मी मुद्दामच बोलते .कारण आता माझं वय झालंय .मी कधीही गचकेन..त्याआधी बोलून घेते. आमच्या इंडस्ट्रीत कोणाचं जर चांगलं बोललं गेलं तर जो काही जळफळाट होतो त्यांचा . आणि हे लोक माझ्याबद्दल बोलतात .पण त्या नालायक लोकांना का कळत नाही की, मी जर वाईट असते मी कोणाला छळलं असतं, त्यांना एवढी अक्कल नाही की आज या बाईची 75 होऊन गेली आहे. तरी ती एवढी वर्ष काम करते .आजही काम करतेय. ज्या लोकांना काम नाहीत, मला कोण बोलवेल अशा आशाळभूत नजरेने फिरत असतात . मी ते ही करत नाही . माझा कोणी पीआर नाही .माझा कोणी मॅनेजर नाही .मला हिंदीतही काम मिळतात .मराठीतही मिळतात .मी अजून काम करते . मला हे बोलायला मिळत नाही कुठे ..
मास्टर शेफ मध्ये गेल्यानंतर मला लताबाईंचा फोन आला .तुझ्यावर सगळे इतकं प्रेम करतात मग मराठीत का काम करत नाहीस असं विचारलं . त्यावर मी म्हटलं मराठीत काम नाही मिळत .तिथे उभ्या उभ्या बसायचं . 'ती अशी आहे ..ती तशी आहे ' असं सांगत बसायचं . असं अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणाल्या .
'लोक नरेंद्र मोदींनाही बोलतात .. '
त्या पुढे म्हणाल्या, मी नुकतीच एक पुण्यातील ज्वेलर्सची जाहिरात केली . तो मला म्हणाला,उषाताई तुम्ही माझ्याकडे काहीच मागितलं नाही .मी म्हटलं, " मला भीक मागायला शिकवलं नाही माझ्या आई वडिलांनी .. " माझं काम करायचं आणि निघायचं .पॅकअप म्हटलं की मी निघते . मी तिथे नंतर थांबत नाही . दोघेजण आहेत आमच्या पुण्यातले ते मला म्हणाले ही जाहिरात तिला देऊ नको .मी त्यांच्यासोबत कामही केलेलं नव्हतं तरीही ते बोलले म्हणजे मी नक्की मोठी झाली आहे . मोठ्या माणसांबद्दल नेहमी मागून खूप बोलतात . नरेंद्र मोदींनाही बोलतात . पण तो माणूस काम करतो . ते लक्ष देत नाहीत . भोंकने वाले कुत्ते को हाती देखता है क्या ? असं उषा नाडकर्णी म्हणाल्या . मला वाईट बोलण्याचं कधीही वाईट वाटत नाही.























