Usha Nadkarni On Audition Process: 'बड्या बापाची मुलगी... तिला सांग माझं नाव गुगल करायला...'; उषा नाडकर्णींनी धुडकावलेली जोया अख्तरची 'गली बॉय', काय घडलेलं?
Usha Nadkarni On Audition Process: एका मुलाखतीत बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री झोया अख्तर म्हणाल्या की, ज्यावेळी मी काम करायला सुरुवात केली, त्यावेळी जन्मालाही न आलेल्या लोकांसाठी ऑडिशन्स द्यायला सांगणं अजिबात सहन होत नाही, असं त्यांनी सांगितलं.

Usha Nadkarni On Audition Process: कित्येक मराठी सिनेमे (Marathi Movie), बॉलिवूड फिल्म्स (Bollywood Films) आणि टेलिव्हिजनच्या (Television Serials) छोट्या पडद्यावर गाजलेल्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या मराठमोळ्या दिग्गज अभिनेत्री उषा नाडकर्णी (Actress Usha Nadkarni) म्हणजेच, चाहत्यांच्या लाडक्या उषाताई. आजही त्यांचा 'माहेरची साडी' सिनेमा (Maherchi Sadi Movie) त्यांच्या बेधडक भूमिकेसाठी ओळखला जातो. तसेच, त्यांची सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडेसोबतची मालिका 'पवित्र रिश्ता' खूप गाजली. आपल्या धाडसी आणि बेधडक वक्तव्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा नाडकर्णींचं सध्या एक वक्तव्य भलतंच चर्चेत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना उषा नाडकर्णी यांनी झोया अख्तरच्या 'गली बॉय' चित्रपटातील भूमिका नाकारल्याबद्दल अगदी स्पष्ट सांगितलं. चित्रपटातील भूमिका नाकारण्याचं कारण, त्यांचा झालेला अपमान असल्याचंही उषाताईंनी मुलाखतीत बोलताना सांगितलं. इतकंच नाहीतर त्यांनी दिग्दर्शक झोया अख्तरला सडेतोड उत्तर दिल्याचंही त्यांनी सांगितलं.
एका मुलाखतीत बोलताना ज्येष्ठ अभिनेत्री झोया अख्तर म्हणाल्या की, ज्यावेळी मी काम करायला सुरुवात केली, त्यावेळी जन्मालाही न आलेल्या लोकांसाठी ऑडिशन्स द्यायला सांगणं अजिबात सहन होत नाही, असं त्यांनी सांगितलं. तसेच, अनेकदा कामासाठी बोलावून अपमानित करण्यात आल्याचंही उषा नाडकर्णी यांनी सांगितलं.
उषा नाडकर्णी नेमकं काय म्हणाल्या?
उषा नाडकर्णी बोलताना म्हणाल्या की, "आता ऑडिशनचं फॅड निघालंय. तुम्ही ऑडिशन घ्या पण विचार करून घ्या. कोणत्या प्रोडक्शनचं मला नाव घ्यायचं नाही. परवा मला एक फोन आला होता. एका भूमिकेची ऑफर होती आणि मला म्हणाला आमच्या ऑफिसमध्ये ऑडिशन द्यायला या. मी त्याला विचारलं 78 वर्षांत मी काय केलं? की तू मला आता ऑडिशन द्यायला सांगत आहेस. असंच गलीबॉय सिनेमाच्या वेळीही झालं होतं".
त्या बड्या बापाच्या मुलीला सांग... : उषा नाडकर्णी
"गली बॉयच्या वेळी एका मुलाचा फोन आला होता. मला म्हणाला ऑडिशन देण्यासाठी या. मी त्याला विचारलं की तुझं वय काय आहे? तो म्हणाला 25 वर्ष...मी त्याला म्हणाले की तुझ्या आईचं लग्न झालेलं नसेल तेव्हापासून मी काम करतेय. मी असं ऑडिशन द्यायचं फालतू काम करत नाही. मी त्याला विचारलं तुमचा दिग्दर्शक कोण आहे? त्याने नाव सांगितलं(झोया अख्तर). मी म्हटलं हो ती बड्या बापाची मुलगी आहे. इंटरनेटवर माझं नाव टाकून सर्च कर. मग कळेल मी किती काम केलंय. मी ऑडिशनवगैरे देत नाही. हवं असेल तर सिनेमात घ्या. रुस्तमच्या वेळी मला बोलवलं. ऑफिसमध्ये एका माणसाने मला काय करायचं सांगितलं. त्यांनी मला ऑडिशन द्यायला सांगितलं नाही. मी छोटी भूमिका केली पण त्याचे पैसे मिळाले", असं उषा नाडकर्णी म्हणाल्या.
मला ऑडिशनवेळी पुस्तक वाचून दाखवायला सांगितलं, मी ते पुस्तक फेकून दिलं : उषा नाडकर्णी
"आजकालची मुलं आली आहेत असिस्टंट दिग्दर्शक बनून. येत काहीच नाही पण मला ऑडिशन द्यायला सांगतात. कविता चौधरीच्या ऑफिसमध्ये बोलवलं होतं. तिथे मुलं बसली होती. त्यातल्या एकानंही मला बसायलाही सांगितलं नाही. ज्या भूमिकेसाठी तुम्ही आलात ती आता नाही असं ते म्हणाले. त्याने मला पुस्तक दिलं आणि मला बोलले हे वाचून दाखवा. मी त्याला म्हटलं हे मी तुला वाचून दाखवू. मी ते पुस्तक घेतलं आणि त्याच्या समोर असं फेकून दिलं. माझं डोकं फिरलं. फालतू मुलं मला बोलणार का वाचून दाखव म्हणून. अशी फालतूगिरी मी सहन नाही करत", असं उषा नाडकर्णी म्हणाल्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























