एक्स्प्लोर

Dhanashree On Divorce With Yuzvendra Chahal: 'मी कोर्टातच जोरजोरात ओरडायला, रडायला लागलेले...'; युजवेंद्रसोबतच्या घटस्फोटावर धनश्री वर्मानं सोडलं मौन

Dhanashree On Divorce With Yuzvendra Chahal: घटस्फोटाच्या दिवशी युजवेंद्र चहलनं घातलेला टी-शर्ट आजवर सर्वांच्या लक्षात राहिला. आता, धनश्रीनं अखेर सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

Dhanashree On Divorce With Yuzvendra Chahal: टीम इंडियाचा (Team India) स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि धनश्री वर्मा (Dhanashree Verma) यांच्या नात्याचा 2025 मध्ये दी एन्ड झाला. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडून सुरू झालेलं नातं, एवढ अनपेक्षित आणि वेगळ्या वळणावर संपलं. कोण बरोबर? कोण चुकीचं? यांसारखे अनेक प्रश्न या दोघांच्या नात्याबाबत उपस्थित करण्यात आले होते. पण दोघांपैकी कुणीही याबाबत स्पष्टीकरण दिलं नाही. ना कोणी यावर एक चकार शब्द उच्चारला. अनेक महिने वेगळं राहिल्यानंतर, या जोडप्यानं वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघेही चर्चेत आले. 

घटस्फोटाच्या दिवशी युजवेंद्र चहलनं घातलेला टी-शर्ट आजवर सर्वांच्या लक्षात राहिला. आता, धनश्रीनं अखेर सर्व आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. धनश्री वर्मानं भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्रसोबतच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच तिचं मौन सोडलं आहे. तसेच, तिनं युजवेंद्रनं वेअर केलेल्या टीशर्टवरचा कंटेन्ट 'बी युअर ओन शुगर डॅडी' यावरही आपलं मत मांडलं आहे.

ह्युमन्स ऑफ बॉम्बेच्या पॉडकास्टमध्ये बोलताना धनश्री वर्मा म्हणाली की, "मला अजूनही आठवतंय जेव्हा मी तिथे उभी होते आणि घटस्फोटाच्या प्रकरणावर सुनावणी जाहीर होणार होती, जरी आम्ही मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार होतो, पण जेव्हा ते घडत होतं, तेव्हा मी खूप इमोशनल झालेले. मी अक्षरशः सर्वांसमोर ओरडून ओरडून रडायला लागली. त्यावेळी मला काय वाटत होतं? त्याचं मी शब्दांत वर्णनही करू शकत नाही."

"मी फक्त ओरडत राहिले आणि ढसाढसा रडत राहिले..."

धनश्री वर्मा पुढे बोलताना म्हणाली की, "मला फक्त एवढंच आठवतंय की, मी फक्त रडत राहिलो, मी फक्त ओरडत राहिलो आणि रडत राहिलो... हे सर्व घडत असताना आणि तो (युजवेंद्र चहल) सर्वात आधी बाहेर गेला..." घटस्फोटाच्या दिवशी युजवेंद्र चहल 'बी युअर ओन शुगर डॅडी' लिहिलेला टी-शर्ट घालून होता. याबद्दल बोलताना धनश्री वर्मा म्हणाली की, "मला माहिती होतं की, लोक मलाच दोष देतील... हा टी-शर्ट स्टंट झाला आहे, हे मला कळण्यापूर्वीच, आम्हा सर्वांना माहीत होतं की, सगळे यासाठी मलाच दोष देणार आहेत..."

चहलच्या टी-शर्ट स्टंटवर काय बोलली धनश्री? 

कोरिओग्राफर धनश्री वर्मा पुढे बोलताना म्हणाली की, "मला वाटतंय की, तुम्ही या बाबतीत खूप मॅच्युअर असलं पाहिजे... मी हा मार्ग निवडला आहे. प्रौढ होऊन लोकांचं लक्ष वेधण्यासाठी बालिश वक्तव्य करण्याऐवजी मी मॅच्युरिटी निवडली. पण मी हा मार्ग निवडणार नाही, कारण मला माझ्या किंवा त्याच्या कौटुंबिक मूल्यांना हानी पोहोचवायची नाही... आपल्याला आदर राखावा लागेल..."

"तुम्ही जे काही सांगितलं, तरी ती फक्त झलक असते. एक महिला म्हणून आपल्याला ते जपून ठेवायला, बांधून ठेवायला शिकवलं जातं. कारण आपण आपल्या समाजाला चांगलं ओळखतो, आपली आई आपल्या समाजाला चांगली ओळखते. तुम्हाला नक्कीच लेबल लावलं जाईल...", असं धनश्री वर्मा म्हणाली.

धनश्री पुढे म्हणाली की, जेव्हा तिला युजवेंद्रच्या टी-शर्टबद्दल आणि त्यावर लिहिलेल्या वाक्याबद्दल कळलं, तेव्हा तिला खूप दुःख झालं. तिला धक्का बसला कारण तिला युजवेंद्र असा स्टंट करेल, अशी अपेक्षा नव्हती. ती म्हणाली, "आम्ही गाडीत बसलो होतो, तेव्हा माझ्या आयुष्याबद्दल विचार माझ्या मनात येऊ लागले. मी विचार करू लागले. मग मी माझा फोन काढला आणि पाहिलं की, खरोखर त्यानं ते वाक्य लिहिलेलं टी-शर्ट घातलेलं... आणि एका सेकंदात लाखो विचार माझ्या मनात आले. आता हे होईल, ते होईल, त्या क्षणी मी विचार करू लागले की, आता पुरे झालं, आता झालं, पुरे झालं, मी का रडू? 

मुलाखतीवेळी होस्टनं धनश्रीला सांगितलं की, युजवेंद्र चहलनं एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं की, त्याला त्याचा मेसेज पाठवायचाय... त्यावर बोलताना धनश्री म्हणाली की, तो ते व्हॉट्सअॅप करू शकला असता, पण त्यानं टी-शर्टवरच का लिहिलं? ती म्हणाली, "अरे भाई, मी व्हॉट्सअॅप केलं असतं. टी-शर्ट का घालायचाय? तसं पाहायला गेलं तर मग टी-शर्टही पुरेसा नाही..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Marathi Actor Dada Kondke Death Story: '...मी मांडीवर दादांचं प्रेत घेऊन गेले'; दादा कोंडकेंच्या निधनानंतर ॲम्ब्युलन्सही मिळाली नव्हती, काय घडलेलं? लेखिकेनं स्पष्ट सांगितलं

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 जानेवारी 2026 | सोमवार
Pune NCP : अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पुण्यातील कार्यालय बळकावलेल्या जागेवर, 300 कोटींच्या व्यवहाराशी पार्थ पवारांचा थेट संबंध; विजय कुंभार यांचा दावा
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
शिवशाही बस अन् दुचाकीचा भीषण अपघात; तीन युवक जागीच ठार, हायवेवर मोठी गर्दी
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
माझी तब्येत ठीक, शुगर वाढली होती; नारायण राणेंनी दिली माहिती, राजकीय निवृत्तीबाबतही स्पष्टच सांगितलं
Nashik Municipal Election 2026 : नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
नाशिक महानगरपालिका: प्रभाग निहाय पक्षीय उमेदवारांची 'अशी' होणार लढत, उमेदवारांची यादी एका क्लिकवर
Tanaji Sawant : तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
तुळजाभवानीच्या भक्तांना आता प्रसाद म्हणून ड्रग्जची पुडी दिली जाईल; तानाजी सावंत यांचा भाजपवर घणाघात
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
Embed widget