Urvashi Rautela : बुर्ज अल अरबवर परफॉर्म करणारी पहिली भारतीय ठरली 'उर्वशी रौतेला'; व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
उर्वशीनं (Urvashi Rautela) सोशल मीडियावर तिच्या पर्फोर्मन्सची झलक असणारा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला उर्वशीनं खास कॅप्शन दिलं.
Urvashi Rautela : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) तिच्या स्टाइलमुळे आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. हनी सिंहच्या 'लव्ह डोस' या गाण्यामुळे उर्वशीला विशेष लोकप्रियता मिळाली. नुकताच उर्वशीनं बुर्ज अल अरबवर परफॉर्म केलं आहे. बुर्ज अल अरबवर परफॉर्म करणारी उर्वशी पहिली भारतीय ठरली आहे. उर्वशीनं सोशल मीडियावर तिच्या पर्फोर्मन्सची झलक असणारा खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला उर्वशीनं खास कॅप्शन दिलं.
उर्वशी रतौलानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिले, 'या वर्ल्ड क्लास संधीसाठी मी सर्वांचे आभार मानते. ' जगभरातील केवळ सात कलाकारांनी बुर्ज अल अरबवर परफॉर्म केलं आहे. अनेकांनी उर्वशीच्या या पोस्टला कमेंट करून तिचं कौतुक केलं. याआधी मार्च 2021 मध्ये उर्वशी स्टाइल स्ट्रीक मॅग्जीनच्या कव्हर पेजवर येणारी पहिली भारतीय महिला ठरली. तसेच 2020 मध्ये अरब फॅशन वीमध्ये सहभाग घेणारी पहिली भारतीय ठरली. ती या शोमध्ये शो स्टॉपर देखील होती.
View this post on Instagram
उर्वशीचा 'इंस्पेक्टर अविनाश' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता रणदीप हुडा देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. उर्वशीने 'मिस युनिवर्स' स्पर्धेत 2015 साली भारताचं प्रतिनिधित्व केले. तिने 2015मध्ये 'मिस डिवा युनिवर्स' किताब मिळवला. त्यानंतर उर्वशीने 2013 मध्ये आलेल्या 'सिंग साब द ग्रेट' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ती ''सनम रे', 'ग्रेट गँड मस्ती', 'हेट स्टेरी 4' आणि 'पागलपंती' अशा अनेक चित्रपटांमध्ये झळकली.
हेही वाचा :
- Prithviraj : मानुषी छिल्लरने 'पृथ्वीराज'च्या सेटवरचा फोटो केला शेअर, राजकुमारी संयोगिताचा रॉयल लूक
- Grammy Awards 2022 : ग्रॅमी पुरस्कार सोहळ्याला सुरुवात, जाणून घ्या भारतात कधी आणि कुठे पाहता येणार
- Filmfare Awads Marathi 2021 : आज प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी, रंगणार 'फिल्म फेअर पुरस्कार सोहळा'
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha