Urfi Javed : 20 किलोच्या काचांपासून तयार केलेला उर्फीचा खास ड्रेस; लूक पाहून नेटकरी म्हणाले....
अनेक वेळा उर्फीला (Urfi Javed) तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते.
Urfi Javed : अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही तिच्या अतरंगी फॅशन्स सेन्समुळे नेहमी चर्चेत असते. बिग बॉस ओटीटीमुळे उर्फीला विशेष लोकप्रियता मिळाली. तिच्या एअरपोर्ट लूकची देखील चर्चा सोशल मीडियावर होते. अनेक वेळा उर्फीला तिच्या बोल्ड कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. उर्फीचे नुकतेच इंस्टाग्रामवर तीन मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत. यानिमित्तानं उर्फीनं एका पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीसाठी उर्फीनं खास ड्रेस परिधान केला होता.
उर्फीचे या पार्टी लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हायरल व्हिडीओमध्ये उर्फी या लूकबाबत माहिती देताना दिसत आहे. ती म्हणते की, हा ड्रेस 20 किलोच्या काचांपासून तयार केलेला आहे. उर्फीच्या या लूकमधील व्हायरल झालेल्या फोटोला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'ती आता कशी बसणार' तर दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलं,'तिला या ड्रेसमध्ये चालता येईल का?' अनेकांनी उर्फीच्या या लूकचं कौतुक केलं तर काहींना तिच्या या लूकला ट्रोल केलं आहे.
View this post on Instagram
उर्फीची संपत्ती
उर्फी 40 ते 55 लाखांची संपत्तीची मालकीन आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडमध्ये काम करण्यासाठी 25 ते 35 हजार मानधन घेते. अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे. . उर्फीच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळते. एका मुलाखतीमध्ये उर्फीनं सांगितलं की, 'मला कोणी काम देत नाही, तसेच माझ्याकडे देखील पैसे नाहीत. ' 2016 साली तिनं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.
संबंधित बातम्या