एक्स्प्लोर

Tumbadchi Manjula Trailer: कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा ट्रेलर

Tumbadchi Manjula Trailer: मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर अनेक मान्यवरांच्या आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.

Tumbadchi Manjula Trailer: सध्या सर्वत्र चर्चेचा विषय असलेला, आपल्या पोस्टर, टिझर आणि गाण्यांमधून प्रचंड उत्सुकता निर्माण केलेल्या झी स्टुडिओजची निर्मिती असलेल्या 'तुंबाडची मंजुळा' (Tumbadchi Manjula) सिनेमाचा ट्रेलर (Movie Trailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला असून त्यातून या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अजूनच जास्त वाढली आहे. रहस्य, भीती , गुढता आणि त्याच्या सोबतीला एकाहून एक अतरंगी गावकऱ्यांची धमाल गोष्ट या ट्रेलरमधून बघायला मिळत असल्याने एक परिपूर्ण मनोरंजक चित्रपटाची मेजवानी मिळणार असल्याची चर्चा प्रेक्षक सोशल मीडियावर करत आहेत. 

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या एका दिमाखदार सोहळ्यात या चित्रपटाचा ट्रेलर अनेक मान्यवरांच्या आणि कलाकारांच्या उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) यांच्या निवेदनातून आपण या गावात आणि त्या विश्वात प्रवेश करतो. या ट्रेलरमध्ये गावाची आणि तिथल्या व्यक्तिरेखांची ओळख करून देताना त्यांच्या खास शैलीतील निवेदनामुळे ट्रेलरला एक वेगळीच रंगत आली आहे. यामध्ये एक गाव, त्यातील गावकरी, त्यांच्यावर घोंगावणारं एक अदृश्य संकट आणि त्यातून घडणाऱ्या असामान्य घटनांची झलक पाहायला मिळते. जरी चित्रपटाला भयपटाची पार्श्वभूमी असली, तरी हा चित्रपट निखळ विनोद आणि भरभरून मनोरंजनाचा अनुभव देणारा असल्याचं ट्रेलरमधून स्पष्ट होतं. 


Tumbadchi Manjula Trailer: कोकणातलं हसतं-खेळतं गाव, पण 'ती' येतं अन् थरकार उडतो; थ्रील-कॉमेडीचा तडका असलेला 'तुंबाडची मंजुळा'चा ट्रेलर

मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure), जितेंद्र जोशी (Jitendra Joshi) , ओम भुतकर (Om Bhutkar), अंशुमन विचारे (Anshuman Vichare), योगेश शिरसाट (Yogesh Shirsat), गणेश पंडीत (Ganesh Pandit), शार्दूल सराफ (Shardul Saraf) यांच्यासोबत इतर कलाकारांचा सहजसुंदर अभिनय, विनोदाचं अचूक टायमिंग, सोबतीला असलेले भन्नाट संवाद यातून या गोष्टीची आणि या गावाची अतरंगी झलक आपल्या बघायला मिळते. पण सोबतीनेच ट्रेलरच्या उत्तरार्धात एका गुढ वलयात दिसणारी सई ताम्हणकर सर्वांचं लक्ष वेधून घेते. तिचं नेमकं पात्र काय आहे ?तिच्या  गुढतेमागची गोष्ट काय आहे ? असा विचार हा ट्रेलर बघणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात येतो आणि या कथेबद्दलची उत्कंठा वाढवतो.  रहस्य उलगडण्याच्या प्रवासात प्रेक्षकांना खळखळून हसवतानाच पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवण्यात ट्रेलर यशस्वी ठरताना दिसत आहे.

दिग्दर्शक विविध कोरेगांवकर म्हणतात, "करीअरच्या सुरुवातीलाच एवढ्या मोठ्या चित्रपटाचं दिग्दर्शन करायची संधी मिळणं ही माझ्यासाठी अत्यंत मोठी गोष्ट आहे. झी स्टुडिओज मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनी माझ्यावर विश्वास टाकत ही संधी मला दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. हा चित्रपट प्रेक्षकांना एका वेगळ्या आणि अनोख्या विश्वात घेऊन जाणारा अनुभव आहे. हा चित्रपट तयार करताना आम्ही प्रत्येक पात्र, त्याची शैली आणि प्रत्येक प्रसंग वेगळ्या पद्धतीने उभा करण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधून आम्ही एक छोटीशी झलक दाखवली आहे. 'तुंबाडची मंजुळा' प्रेक्षकांना नक्की आवडेल, याची आम्हाला खात्री आहे..."

झी स्टुडियोजचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर म्हणतात, "तुंबाडची मंजुळा हा  खऱ्या अर्थानं पूर्णपणे झी स्टुडिओजची निर्मिती असलेला चित्रपट आहे त्यामुळे आमच्यासाठी त्याचं विशेष महत्त्व आहे. आपल्या प्रेक्षकांना एक परीपूर्ण मनोरंजन देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकाहून एक दिग्गज कलाकार , गुढता आणि रहस्याभोवती फिरणाऱ्या गोष्टीला दिलेला विनोदाचा तडका , श्रवणीय संगीत असे मनोरंजनाचे विविध पैलू यात प्रेक्षकांना बघायला मिळतील. सध्या प्रेक्षकांना मनोरंजनासोबत काहीतरी वेगळं आणि ताजं पाहायचं आहे आणि हा चित्रपट त्याच अपेक्षांवर नक्कीच खरा उतरेल, असा विश्वास आम्हाला आहे. रहस्य, विनोद आणि कलाकारांची भन्नाट केमिस्ट्री यामुळे हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आपलासा वाटेल..."

दरम्यान, रहस्य, विनोद आणि दमदार कथानकाची मेजवानी घेऊन येणारा 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट आता 5 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. विविध कोरगांवकर दिग्दर्शित या चित्रपटाची कथा आणि लेखन ऋषिकेश तुरई यांनी केले असून झी स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर यांनी केली आहे.

'तुंबाडची मंजुळा'चा ट्रेलर पाहिलात?

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Drishyam 3 Advance Booking: बॉक्स ऑफिसवर येण्याआधीच ‘दृश्यम 3’ची दहशत! जगभरातून होतंय जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग;  किती कमावले?

ABP माझाच्या बातम्या LIVE... 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda on Mother: ...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
...तेव्हा नर्मदा नदीत उतरला गोविंदा, आयुष्य संपवण्याचा विचार; अभिनेत्याने 30 वर्षांपूर्वीचा किस्सा सांगितला
Detective on Actress: 'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
'पैशांसाठी ठेवते शरीरसंबंध, पब्लिकमध्ये तिची क्युट इमेज', डिटेक्टिव्हचा प्रसिद्ध अभिनेत्रीबाबत धक्कादायक दावा
Mrunal Thakur on Dating: मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
मृणाल ठाकूर 'या' क्रिकेटरला करतेय डेट? नक्की खरं काय? अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली...
Upcoming Movies Box Office: 14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
14 ऑगस्टला बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका! एकाच दिवशी रिलीज होणार 'या' 4 मोठ्या फिल्म्स; कोण मारणार बाजी?
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget