एक्स्प्लोर

Drishyam 3 Advance Booking: बॉक्स ऑफिसवर येण्याआधीच ‘दृश्यम 3’ची दहशत! जगभरातून होतंय जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग;  किती कमावले?

तसेच हा मोहनलालच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक ठरू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Drishyam 3 Mohanlal: दृश्यम 3 या चित्रपटाची सध्या जगभरात जोरदार चर्चा सुरू असून प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने कमाईचे नवे विक्रम रचण्यास सुरुवात केली आहे. मोहनलालच्या बहुचर्चित थ्रिलर फ्रँचायझीच्या (Mohanlal Drishyam 3) तिसऱ्या भागासाठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. याच उत्सुकतेचा परिणाम आता अॅडव्हान्स बुकिंगमध्येही दिसून येत असून ‘दृश्यम 3’च्या तिकिटांची विक्री वेगाने होत आहे.

दिग्दर्शक जितू जोसेफ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या चित्रपटात साऊथ सुपरस्टार मोहनलाल पुन्हा एकदा जॉर्जकुट्टीच्या अविस्मरणीय भूमिकेत दिसणार आहेत. ‘दृश्यम’ मालिकेच्या आधीच्या दोन भागांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यामुळे तिसऱ्या भागाकडूनही प्रचंड अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

दृश्यम 3 ची जगभरातील ॲडव्हान्स बुकिंग किती ?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘दृश्यम 3’ने जगभरातील अॅडव्हान्स बुकिंगमधून 21 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तिकीट विक्रीचा वेग पाहता हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. फिल्म अॅनालिस्ट एबी जॉर्ज यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ‘दृश्यम 3’च्या प्री-सेलबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, पहिल्या दिवसाच्या प्री-सेलने 20 कोटींचा टप्पा पार करण्याची तयारी पूर्ण केली असून आतापर्यंत 17 कोटींपेक्षा अधिक कमाई झाली आहे. तसेच हा मोहनलालच्या कारकिर्दीतील सर्वात मोठ्या ओपनिंगपैकी एक ठरू शकतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

देशांतर्गत बाजारपेठेतही ‘दृश्यम 3’ला दमदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विशेषतः केरळमध्ये चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, केवळ केरळमधील आगाऊ बुकिंगची रक्कम सुमारे 5.50 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर संपूर्ण भारतात चित्रपटाच्या प्री-सेलचा आकडा 9 कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मलयाळमसोबतच हा चित्रपट तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटकसह इतर राज्यांमध्येही चित्रपटाच्या डब व्हर्जनला चांगली मागणी असल्याचं दिसून येत आहे.

कोणत्या देशातून किती तिकीट विक्री ?

परदेशी बाजारपेठेतही ‘दृश्यम 3’चा दबदबा कायम आहे. गल्फ देशांमध्ये चित्रपटाच्या बुकिंगला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून उत्तर अमेरिका, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलियामध्येही तिकीट विक्रीचा वेग चांगला असल्याचं समोर आलं आहे. सध्याचा ट्रेंड कायम राहिल्यास पहिला शो सुरू होण्यापूर्वीच हा चित्रपट अॅडव्हान्स बुकिंगमधून जगभरात 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करू शकतो, असा अंदाज व्यापार तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.

प्रदर्शनापूर्वीच मिळत असलेल्या या जबरदस्त प्रतिसादामुळे आता ‘दृश्यम 3’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चित्रपट पहिल्याच दिवशी जगभरात 35 कोटी रुपयांहून अधिक कमाई करू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. या चित्रपटात मोहनलालसोबत मीना, अंसीबा हसन, इस्थर अनिल, मुराली गोपी, सिद्दकी,  आशा शारथ, शांती मायादेवी आणि वीना नंदकुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या

‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
‘किंग’ पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करणार? शाहरुख खानच्या स्टारडमवर तरण आदर्श यांचं मोठं विधान!
OTT Crime Thriller:नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
नेटफ्लिक्सवर या जबरदस्त क्राइम थ्रिलरचा धुमाकूळ! टॉप 10 मध्ये थेट दुसऱ्या क्रमांकावर, 1 तास 56 मिनिटांचा हा सिनेमा पाहिलात का?
Nana Patekar Kon Honaar Crorepati: माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
माधुरी दीक्षितसोबत KBC मध्ये दिसणार होते नाना, अचानक निधनाने सगळंच फिस्कटलं; मेकर्सने बोलवला 'नवा गेस्ट'
Columbus Marathi Movie: 'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'चला हवा येऊ द्या' फेम कलाकाराला लागली 'कोलंबस'ची लॉटरी! सिनेमा कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget