Jon Landau Death : 'टायटॅनिक' आणि 'अवतार' चित्रपटाचे निर्माते जॉन लैंडो यांचं निधन, ऑस्कर विजेत्यानं घेतला जगाचा निरोप
Jon Landau Death : 'टायटॅनिक' चित्रपटाने निर्माते जॉन लैंडो यांचं निधन झालं आहे. त्यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
Jon Landau Death : हॉलिवूडमधून एक मोठी दु:खद बातमी समोर आली आहे. 'टायटॅनिक' आणि 'अवतार' यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचे निर्माते जॉन लैंडो यांचं निधन झालं आहे. हॉलीवूडचे दिग्गज निर्माते जॉन लैंडो यांनी वयाच्या 63 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ऑस्कर विजेते जॉन लैंडो यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 'अवतार' फेम अभिनेत्रीने देखील त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. अभिनेत्री जो सलदानाने खास पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली दिली आहे.
हॉलिवूड निर्माते जॉन लैंडो यांचं निधन
हॉलीवूडचे दिग्गज निर्माते जॉन लैंडो यांनी 90 च्या दशकात टायटॅनिक चित्रपटाचे प्रोड्युसर होते. या चित्रपटाने जगभरात भरघोस कमाई केली होती. या चित्रपटाचे प्रोड्युसर जॉन लैंडो यांनी आता जगाचा निरोप घेतला आहे. जॉन लैंडो यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. जॉन लैंडो यांनी टायटॅनिकसोबतच अवतार चित्रपटाचेही निर्माते होते.
Jon Landau, Producer of Avatar, Has Died at Age 63 https://t.co/qyhqwEydL0 pic.twitter.com/kzqeownVya
— Gizmodo (@Gizmodo) July 6, 2024
'टायटॅनिक' आणि 'अवतार' चित्रपट निर्माते
ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या जॉन लैंडो यांनी टायटॅनिक आणि अवतार सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांचीही निर्मिती केली होती. वयाच्या 63 वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी त्यांच्या निधनाबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी एक निवेदन जारी केलं आहे. निवेदन जारी करत त्यांच्या कुटुंबाने ही दुःखद बातमी शेअर केली आहे. दरम्यान, त्यांच निधन कशामुळे झालं याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
'अवतार' फेम अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख
जॉन लैंडो यांच्या निधनानंतर चित्रपट जगताला मोठा धक्का बसला आहे. जॉन लैंडो यांच्या अवतार या चित्रपटातील सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री झो सलडाना (Zoe Saldana) हिने सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. झोने इंस्टाग्राम पोस्टमध्ये जॉन लैंडोसोबतचे खास फोटो शेअर केले आहेत. यासोबत त्यांनी एक भावनिक पोस्टही लिहिली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :