ज्या खटल्याने देशाचं भविष्य बदललं, त्याच 'शाहबानो केस'वर चित्रपट येणार, यामी गौतम साकारणार भूमिका!
देशभरात गाजलेल्या शाहबानो खटल्यावर आता लवकरच चित्रपट येणार आहे. विशेष म्हणजे यामी गौतम या चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका साकारणार आहे.
मुंबई : गेल्या काही काळात बॉलिवुडमध्ये सत्य घटनांवर आधारित अनेक दर्जेदार चित्रपट आले आहेत. यातील काही चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. दरम्यान, या वर्षी आता अशाच एका सत्य घटनेवर आधारलेला एक मोठा चित्रपट येणार आहे. या घटनेनं भारताचं एका प्रकारे भविष्यच बदललं होतं. हीच घटना आता रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम प्रमुख नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटाचा नेमका विषय काय आहे?
यामी गौतम प्रमुख नायिके असलेला हा चित्रपट शाहबानो खटल्यावर आधारित असणार आहे. यामी गौतम या अभिनेत्रीने याआधी आर्टिकल 370 या चित्रपटातही काम केलेले आहे. त्यानंतर आता ती या चित्रपटात शाहबानोची भूमिका साकारणार आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी शाहबानो आई झाली आहे. असे असताना आता तिने या चित्रपटासाठी तयारी चालू केली आहे. आई झाल्यानंतर तिचा हा पहिलाच चित्रपट असणार आहे.
शाहबानो खटला नेमका काय होता?
भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात शाहबानो हा खटला चांगलाच प्रसिद्ध आहे. या खटल्यातील निकालानंतर भारतीय समाजकारण, राजकारणाची दिशा बदलली होती. हा खटला मोहम्मद अहमद खान विरुद्ध शाहबानो असा होता. याच खटल्यावर आता चित्रपट येतोय. या चित्रपटात यामी गौतम 62 वर्षीय शाहबानोची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका जिंवत व्हावी यासाठी यामी गौतम आतापासूनच तयारीला लागली आहे. हा चित्रपट नेमका कधी प्रदर्शित होणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शाहबानो यांच्या बाजूने दिला होता निकाल
मोहम्मद अहमद खान हे शाहबानो यांचे पती होते. त्यांनी तीन तलाकच्या माध्यमातून शाहबानो यांना तलाक दिला होता. त्यानंतर शाहबानो यांनी पोटगीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र मोहम्मद खान यांनी पोटगी देण्यास नकार दिला होता. मी मुस्लीम पर्सनल लॉच्या मदतीने हा तलाक दिलेला आहे, त्यामुळे मी पोटगी देण्यास बांधील नाही, असे मत त्यांनी मांडले होते. महिलेला पोटगी फक्त इद्दतच्या वेळीच दिली जाते, असाही दावा त्यांनी केला होता. त्यानंतर हा खटला साधारण सात वर्षे चालला. एप्रिल 1958 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाहबानो यांच्या बाजूने निकाल देत हा खटला मार्गी लावला होता. या निकालानंतर भारतीय समाजकारण बदलले होते.
यामी गौतमचा धूम धाम चित्रपट येणार
दरम्यान, शाहबानो खटल्यावर आधारलेला हा चित्रपट जंगली पिक्चर्सतर्फे निर्माण केला जाणार आहे. विशाल गुरनानी आणि जुही पारेख मेहता हे दोघे मिळून या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुपर्ण वर्मा करणार आहोत. त्यांनी फॅमिली मॅन या वेब सिरिजच्या दुसऱ्या पर्वाचे दिग्दर्शन केलेले आहे. यामी गौतम हिचा धूम धाम नावाचाही चित्रपट येतोय.
हेही वाचा :
काळ्या बिकिनीमध्ये आलिया भट्टचा नो मेकअप लूक; राहाची आई बीचवर दिसली सनबाथ घेताना!
Huppa Huiya 2: हुप्पा हुय्या म्हणत मारुतीरायाचा भक्त, हणम्या लवकरच भेटीला; 'हुप्पा हुय्या 2'ची घोषणा
Madhuri Dixit: माधुरीचा मनमोहक अंदाज; सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल!