एक्स्प्लोर

स्वर मंगेश...मास्टर दीनानाथ यांच्या स्वरप्रवासातील खास आठवणी एबीपी माझावर

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 79व्या पुण्यतिथीनिमित्त एबीपी माझावर आज रात्री 9 वाजता 'स्वर मंगेश' हा खास माहितीपट पाहायला मिळणार आहे.

मुंबई : ज्येष्ठ नाट्य कलावंत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या 79व्या पुण्यतिथीनिमित्त एबीपी माझावर आज रात्री 9 वाजता 'स्वर मंगेश' हा खास माहितीपट पाहायला मिळणार आहे. साक्षात गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि संगीत नाट्यसृष्टीतील एका जमान्यातल्या दिग्गजांकडून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची महती ऐकायला मिळणार आहे. 

दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांना 'मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार' देण्यात येतो. परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं नाही. त्यामुळए यंदा दीनानाथ मंगेशकर यांच्या पुण्यतिथीला त्यांचा संगीत-नाट्य क्षेत्रातील प्रवास उलगडण्याचा प्रयत्न मंगेशकर कुटुंबीयांनी केला आहे. त्याचं प्रसारण 'एबीपी माझा'वर आज रात्री 9 वाजता होणार आहे.. 

या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर आपल्या बाबांबद्दलच्या आठवणींना उजाळा देणार आहेत. शिवाय संगीत नाट्यसृष्टीतील एका जमान्यातल्या दिग्गजांकडून दीनानाथ मंगेशकर यांची महती ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर दीनानाथांच्या लहानपणापासूनची दुर्मिळ छायाचित्रेही या माहितीपटात आहेत. 

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर
दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे वर्ष 2020 साठीचे मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार आज त्यांच्या 79व्या स्मृतीदिनी जाहीर करण्यात आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासाठी डॉ. प्रतित समधानी, डॉ. अश्विन मेहता, डॉ. राजीव शर्मा, डॉ. जनार्दन निंबाळकर, डॉ. निशित शहा तर अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, प्रेम चोपडा, नाना पाटेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ज्येष्ठ कवी-गीतकार संतोष आनंद, ज्येष्ठ संगीतकार प्यारेलाल शर्मा, ज्येष्ठ संगीतकार मीना खडिकर, ज्येष्ठ गायिका-संगीतकार उषा मंगेशकर यांच्यासह वृत्तपत्र पत्रकारितेसाठी दै. सामनाचे कार्यकारी संपादक शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एक लाख 11 हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Schedule: इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!
इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Hyderabad Crime News : मला देवाला भेटायचंय; नवरा कामावर जाताच बायकोने पाचव्या मजल्यावरून मारली उडी, शेजाऱ्यांची माहिती ऐकून पोलीसही चक्रावले
मला देवाला भेटायचंय; नवरा कामावर जाताच बायकोने पाचव्या मजल्यावरून मारली उडी, शेजाऱ्यांची माहिती ऐकून पोलीसही चक्रावले
Sambhaji Bhide: सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा: संभाजी भिडे
सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा: संभाजी भिडे
Sonalee Kulkarni On Marriage Rumors: 'माझं एका पॉलिटिशियनसोबत लग्न झालंय आणि...'; चर्चांवर सोनाली कुलकर्णीनं स्वतः सांगितलेलं सगळं, काय घडलेलं?
'माझं एका पॉलिटिशियनसोबत लग्न झालंय आणि...'; चर्चांवर सोनाली कुलकर्णीनं स्वतः सांगितलेलं सगळं, काय घडलेलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Anmol Ratna Award 2025 : महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार 2025 : ABP Majha
Majha Katta Yasmin Shaikh:मी धर्माने मुस्लिम नाही.. यास्मिन शेख असं का म्हणाल्या, लग्न कसं घडलं?
Majha Katta Yasmin Shaikh : माटे मास्तरांनी यास्मिन शेख यांना काय आशीर्वाद दिला?
Majha Katta Yasmin Shaikh : यास्मिन शेख यांनी भारताचा स्वातंत्र्यदिन प्रत्यक्ष अनुभवला..
Majha Katta Yasmin Shaikh:पंढरपूरच्या शाळेतील डब्बाबाबत घडलेला तो प्रसंग यास्मिन शेख यांनी सांगितला

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Schedule: इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!
इंग्लंडविरुद्धचा दौरा संपला, आता टीम इंडिया पाकिस्तानसोबत भिडणार; पाहा संपूर्ण वेळापत्रक!
Hyderabad Crime News : मला देवाला भेटायचंय; नवरा कामावर जाताच बायकोने पाचव्या मजल्यावरून मारली उडी, शेजाऱ्यांची माहिती ऐकून पोलीसही चक्रावले
मला देवाला भेटायचंय; नवरा कामावर जाताच बायकोने पाचव्या मजल्यावरून मारली उडी, शेजाऱ्यांची माहिती ऐकून पोलीसही चक्रावले
Sambhaji Bhide: सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा: संभाजी भिडे
सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा: संभाजी भिडे
Sonalee Kulkarni On Marriage Rumors: 'माझं एका पॉलिटिशियनसोबत लग्न झालंय आणि...'; चर्चांवर सोनाली कुलकर्णीनं स्वतः सांगितलेलं सगळं, काय घडलेलं?
'माझं एका पॉलिटिशियनसोबत लग्न झालंय आणि...'; चर्चांवर सोनाली कुलकर्णीनं स्वतः सांगितलेलं सगळं, काय घडलेलं?
Donald Trump : रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
रशियाकडून तेल खरेदी करुन भारत मोठा नफा कमावतोय, त्यामुळे अजून मोठा टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
Dadar Kabutar khana: कबुतरखान्यांवरील कारवाईने गुजराती-जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढांनीही शड्डू ठोकला, फडणवीसांनी बोलावली बैठक
कबुतरखान्यांवरील कारवाईने गुजराती-जैन समाज नाराज, मंगलप्रभात लोढांनीही शड्डू ठोकला, फडणवीसांनी बोलावली बैठक
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
जम्मू आणि काश्मीरमध्ये सरकारी नोकरीची मोठी संधी, पगार मिळणार 81 हजार रुपये, कसा कुठे कराल अर्ज? 
Muslim Actress Married With Hindu Actor: पडद्यावर ज्या हिंदू अभिनेत्याची 'काकी' झाली, खऱ्या आयुष्यात 'ही' मुस्लिम अभिनेत्री त्याच्यावरच भाळली; धर्माची चौकट मोडून बांधली साताजन्माची गाठ
पडद्यावर ज्या हिंदू अभिनेत्याची 'काकी' झाली, खऱ्या आयुष्यात 'ही' मुस्लिम अभिनेत्री त्याच्यावरच भाळली; धर्माची चौकट मोडून बांधली साताजन्माची गाठ
Embed widget