Muslim Actress Married With Hindu Actor: पडद्यावर ज्या हिंदू अभिनेत्याची 'काकी' झाली, खऱ्या आयुष्यात 'ही' मुस्लिम अभिनेत्री त्याच्यावरच भाळली; धर्माची चौकट मोडून बांधली साताजन्माची गाठ
Muslim Actress Married With Hindu Actor: खऱ्या आयुष्यात, किश्वर आणि सुयशच्या वयात 8 वर्षांचा फरक आहे. अभिनेत्री तिचा नवरा आणि गायक-अभिनेता सुयाश रायपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे.

Muslim Actress Married With Hindu Actor: सिनेसृष्टीत एकमेकांसोबत काम करताना लग्न करणं, ही अगदी सर्वसामान्य बाब आहे. बॉलिवूडमध्ये (Bollywood) तर असी अनेक उदाहरणं आहेत. अनेक फिल्म्समध्ये एकत्र काम करणारे कलाकार आपापसांत साताजन्माची गाठ बांधतात. पण, आज आम्ही तुम्हाला अशा जोडीबाबत सांगणार आहोत, ज्यांनी टेलिव्हिजनवरच्या गाजलेल्या मालिकेत काकी आणि पुतण्याची भूमिका साकारलेली. पण, खऱ्या आयुष्यात मात्र त्यांनी लग्न केलं. पण, त्या दोघांमधील अंतर 8 वर्षांचं होतं.
2010 ते 2011 दरम्यान हिंदीमध्ये 'प्यार की ये एक कहानी' ही मालिका प्रसारित झाली. या हिंदी मालिकेत आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री किश्वर मर्चंट (Kishwer Merchant) होती. त्याच मालिकेतील अभिनेता सुयश रायनं (Suyash Rai) तिच्या मुलाच्या म्हणजेच, विवयन डिसेनाच्या मित्राची भूमिका साकारली होती. विवेनच्या मित्राच्या भूमिकेत दिसणारा सुयश हा मालिकेत किश्वरच्या मुलाच्या वयाचा होता.
पण खऱ्या आयुष्यात, किश्वर आणि सुयशच्या वयात 8 वर्षांचा फरक आहे. अभिनेत्री तिचा नवरा आणि गायक-अभिनेता सुयाश रायपेक्षा 8 वर्षांनी मोठी आहे. 'प्यार की एक कहानी' या मालिकेत दोघांच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी भरभरुन कौतुक केलेलं. पण हे दोघे प्रेमात पडतील असं कोणालाही वाटलं नाही. शोमध्ये, सुयाशची काकू किंवा फक्त असे म्हणा की, तिच्या 'काकी'च्या भूमिकेत दिसलेल्या किश्वरनं तिच्यापेक्षा 8 वर्षांनी लहान असलेल्या तरुणाशी लग्न करणार असल्याचं जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
View this post on Instagram
फक्त वयाचंच अंतर नाही, दोघांनी धर्माची चौकटही मोडली
किश्वर आणि सुयश यांच्यात फक्त वयाचंचं अंतर नव्हतं, तर दोघांचे धर्मही वेगवेगळे होते. पण, दोघांनीही प्रेमासाठी धर्माची भिंत ओलांडली. त्यांनी समाजाची काळजी न करता सर्व चौकटी मोडून एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. मुस्लिम किश्वर मर्चंट आणि हिंदू पंजाबी असलेल्या सुयशनं एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या नात्यात धर्म कधीच आला नाही. दोघांनी 2016 मध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली.
खरंतर दोघांनी यापूर्वीच एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला. पण, सुयशच्या आई-वडिलांनी लग्नाला विरोध केला. त्यांची होणारी सून त्यांच्या मुलापेक्षा 8 वर्षांनी मोठी होती, म्हणून त्यांनी लग्नाला नकार दिलेला. पण, सुयशनं त्याच्या पालकांना पटवून दिल्यानंतर अखेर त्यांनी मुलाच्या लग्नाला परवानगी दिली.
किश्वर आणि सुयशनं लग्नानंतर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आलेले. दोघांनाही ट्रोलर्सचा सामना करावा लागला. वयातील अंतरामुळे अनेकांनी दोघांवर टीकेची झोड उठवली. पण, त्या दोघांनीही याकडे दुर्लक्ष केलं. 2021 मध्ये अभिनेत्रीनं मुलाला जन्म दिला.
किश्वर आणि सुयश यांचा मुलगा निरवार दोन्ही धर्मांचं पालन करतो. अभिनेत्रीनं स्वतः सोशल मीडियावर फोटो शेअर करुन याबाबत खुलासा केलेला. किश्वर मर्चंटच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर, किश्वर मर्चंट 'प्यार की ये एक कहानी' व्यतिरिक्त 'हिप हॉप हुर्रे', 'एक हसीना थी', 'इतना करो ना मुझे प्यार', 'हर मुश्किल का हल अकबर बीरबल' आणि 'कैसी ये यारियां' यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























