Sonalee Kulkarni On Marriage Rumors: 'माझं एका पॉलिटिशियनसोबत लग्न झालंय आणि...'; चर्चांवर सोनाली कुलकर्णीनं स्वतः सांगितलेलं सगळं, काय घडलेलं?
Sonalee Kulkarni On Marriage Rumors: मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं आपल्या लग्नाबाबत महत्त्वाचा खुलासा केलेला.

Sonalee Kulkarni On Marriage Rumors: मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Film Industry) आघाडीची 'अप्सरा आली' फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आपल्या अदांनी अनेकांना घायाळ करते. सोनालीचं सौंदर्य, तिची ड्रेसिंग स्टाईल यामुळे आजही ती अनेकांच्या गळ्यातील ताईत आहे. सोनालीनं मराठी सिनेसृष्टीसोबतच हिंदी (Hindi Movies) आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही (South Movies) आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. कधीकधी सेलिब्रिटींच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा त्यांच्या पर्सनल लाईफच्या चर्चा जास्त रंगतात. असाच एक किस्सा सोनालीसोबतही घडलेला. सोनालीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत जोरदार चर्चा रंगलेल्या आणि एका गोष्टीवर सर्वांच्या चर्चा सुरू होत्या. याबाबत सोनालीनं एका मुलाखतीत बोलताना स्वतः खुलासा केलेला.
काही दिवसांपूर्वी सोनाली कुलकर्णी (Marathi Actress Sonalee Kulkarni) 'पटलं तर घ्या'मध्ये आलेली. यादरम्यान, तिनं तिच्याबाबत बोलल्या जाणाऱ्या एका गोष्टीचा खुलासा केला होता. सोनालीबाबत एक चर्चा रंगली होती, तसेच, ही गोष्ट खरी की खोटी? याबाबतही अनेक चर्चा सुरू होत्या. त्यावेळी सोनाली कुलकर्णीचं कुणा एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालेलं, अशा चर्चा रंगलेल्या. त्यावर सोनालीनं पहिल्यांदाच आपली बाजू मांडली आहे.
सोनालीचं लग्न एका राजकीय नेत्यासोबत झालेलं?
'पटलं तर घ्या'मध्ये बोलताना सोनाली कुलकर्णी तिच्या लग्नाच्या अफवेबद्दल बोलताना म्हणाली की, "माझं एका पॉलिटिशनसोबत लग्न झालंय, त्यांनी मला राहायला घरं दिलंय. जेव्हा ही अफवा पसरली होती, तेव्हा मला अनेकांचे फोन आले. माझ्या चुलत बहिणीनं देखील मला फोन करुन विचारलं की, काय तुझं लग्न झालंय का? मी तिला म्हटलं की, अगं माझं लग्न झालं तर मी तुला लग्नाला बोलवणार नाही का? बहिण आहेस ना माझी तू... त्यावर ती म्हणाली की, नाही राहून गेलं असेल घाई गडबडीत... मी म्हटलं असं कसं राहील? काहीही काय बोलतेस, मग तिनं सांगितलं की, नेत्यासोबत लग्न झालंय असं म्हटलं जातंय... त्यानं घर दिलंय... मी थोडावेळ स्तब्ध झाले होते. पण असं कधीच काहीच नव्हतं. या निव्वळ चर्चा होत्या..."
दरम्यान, मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनाली कुलकर्णीचा मराठी सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. सोनालीनं आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले. त्यातला सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांच्यासोबतच्या 'बकुळा नामदेव घोटाळे' सिनेमानं तिला ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिनं मराठीत अनेक सिनेमे केले. पुढे 'नटरंग', 'मितवा', 'हंपी', 'व्हिक्टोरिया एक रहस्य', 'क्षणभर विश्रांती', 'गाढवाचं लग्न', 'पोश्टर गर्ल' यांसारख्या सिनेमांमधून सोनालीनं मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















