Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरच्या 'गालिब' नाटकामध्ये 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका
Chinmay Mandlekar: गालिब हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं केलं आहे.
![Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरच्या 'गालिब' नाटकामध्ये 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका chinmay mandlekar new play ghalib This actor will play the lead role in ghalib play Chinmay Mandlekar: चिन्मय मांडलेकरच्या 'गालिब' नाटकामध्ये 'हे' कलाकार साकारणार प्रमुख भूमिका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/11/05/76ef627c9d7201d925e117efbb114f381699176337409259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकरचं (Chinmay Mandlekar) एक नवं कोरं नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिन्मयचं गालिब हे नाटक प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालं आहे. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं केलं आहे. या नाटकामध्ये कोणते कलाकार काम करणार आहेत? तसेच नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग कधी पार पडणार आहे? याबद्दल जाणून घेऊयात...
हे कलाकार साकारणार प्रमुख भूमिका-
गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी,अश्विनी जोशी, गुरुराज अवधानी हे कलाकार गालिब या नाटकामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. गालिब या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग हा आज (5 नोव्हेंबर ) ठाण्यातील गडकरी रंगायत येथे पार पडणार आहे. तसेच पुण्यात 11 नोव्हेंबरला या नाटकाचा प्रयोग पार पडणार आहे.
मुंबईमधील प्रयोग-
रविवार 5 नोव्हेंबर दु. 4:30 वाजता गडकरी रंगायत, ठाणे.
सोमवार 13 नोव्हेंबर दु. 4 वा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले
शनिवार 18 नोव्हेंबर दु. 4 वा. यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा
रविवार 19 नोव्हेंबर दु. 4 वा. प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली
पुण्यातील प्रयोग-
शनिवार 11 नोव्हेंबर दु. 12:30 वा. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड
शनिवार 11 नोव्हेंबर सायं. 5: 30 वा. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
View this post on Instagram
चिन्मयनं सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन गालिब या नाटकाच्या प्रयोगाची माहिती दिली होती. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं होतं, “तुझ्या डोळ्यात मांजराची धिटाई आणि हरणाचं बावरलेपण दोन्ही आहे.” मराठी रंगभूमी दिनी , अर्थात 5 नोव्हेंबरला येत आहे नवीन नाटक-गालिब"
View this post on Instagram
सनी, द कश्मीर फाइल्स ,पावनखिंड, शेर शिवराज यांसारख्या चित्रपटांमधून चिन्मय प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामधील चिन्मयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच चिन्मयच्या सुभेदार या चित्रपटानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता चिन्मयच्या गालिब या नाटकाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या नाटकामधील कलाकारांचा अभिनय पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)