![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chinmay Mandlekar: "करोडो शून्यांपेक्षा 'एक' कधीही मोठा असतो"; चिन्मय मांडलेकरचं 'गालिब' नाटक येणार प्रेक्षकांच्या भेटीस
चिन्मयचं (Chinmay Mandlekar) नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिन्मयनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
![Chinmay Mandlekar: Chinmay Mandlekar share post on social media about his new play Ghalib Chinmay Mandlekar:](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/10/22/83c8ec088dc9b7614dec76c40f22f17b1697974353538259_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Chinmay Mandlekar: अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. चिन्मय हा सध्या त्याच्या काला पानी या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या वेब सीरिजमधील चिन्मयच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तसेच चिन्मयचा 'सजिनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ' हा चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहे. चिन्मयचं आता एक नवं कोरं नाटक देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चिन्मयनं सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करुन या नाटकाची माहिती चाहत्यांना दिली आहे.
चिन्मयनं शेअर केली पोस्ट
चिन्मय सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या गालिब या नाटकाची माहिती देण्यात आली आहे. गालिब या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मांडलेकरनं केलं आहे. तर या नाटाकाची प्रकाशयोजना आणि नेपथ्य हे प्रदीप मुळ्ये करणार आहेत. नाटकाच्या संगीताची जबाबदारी ही राहुल रानडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चिन्मयनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'नवीन नाटक. लवकरच! '
चिन्मयनं शेअर केलेल्या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला असून अनेकांनी चिन्मयला त्याच्या या नव्या नाटकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ऋतुजा बागवे, श्रेया बुगडे,प्रिया मराठे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चिन्मयला त्याच्या या नव्या नाटकासाठी शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
सनी, द कश्मीर फाइल्स ,पावनखिंड, शेर शिवराज यांसारख्या चित्रपटांमधून चिन्मय प्रेक्षकांच्या भेटीस आला. 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या चित्रपटामधील चिन्मयच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. तसेच चिन्मयच्या सुभेदार या चित्रपटानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. चिन्मय मांडलेकरनं सुभेदार या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटात चिन्मय मांडलेकरसोबतच अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी,विराजस कुलकर्णी, शिवानी रांगोळे या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)