एक्स्प्लोर

Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुण्यातील शेवटच्या प्रचारसभेतही देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांना सोडलं नाही, म्हणाले, 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा'

Devendra Fadnavis and Ajit Pawar: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भाजप एकमेकांच्याविरोधात लढत आहेत. अजितदादा आणि फडणवीसांमध्ये वाकयुद्ध

Devendra Fadnavis and Ajit Pawar Pune Election 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात शेवटची सभा घेतली. या शेवटच्या सभेतही देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य केले. अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांची राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एकत्र निवडणूक लढत आहेत. त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना मोफत पीएमपीएल बससेवा आणि मोफत मेट्रो (Pune Metro) प्रवासाचे आश्वासन दिले आहे. याच मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या शेवटच्या सभेत अजित पवार यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले. मला कोणावर टीका करायची नाही. पण काहीजणांना आश्वासन देताना आपण कुठून पूर्ण करणार आहोत हे माहिती नाही. 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', अशी पुण्यात एक म्हण आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. (Pune Mahangarpalika Election 2026)

माननीय मोदींजींच्या नेतृत्त्वात गेली काही वर्षे सातत्याने एक नवीन पुणे तयार करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. पुण्यात आधुनिकता यावी, पुण्याचे दळणवळण चांगले व्हावे, झोडपट्टीत राहणारे नागरिक आणि आर्थिक दुर्बलांना जास्तीत जास्त सोयी देण्यासाठी आम्ही सातत्याने आम्ही प्रयत्न करत आहोत. काही लोकांना असं वाटतं, महानगरापलिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक आहे. ही गल्लीबोळातील दादा तयार करण्याची निवडणूक नाही, ही शहराचं भावी नेतृत्व करण्याची निवडणूक आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तुम्ही निवडून देणारे नगरसेवक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. जितका निधी लागेल तितका निधी मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला देईल. पुण्यातील 32 रस्त्यांवर वाहतूक डी कन्जेस्ट करणार आहोत, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

जोपर्यंत तुमचा लाडका देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही जिंकल्यानंतर माझ्या बहिणींना लाडकी बहीण ठेऊ नका, लखपती दीदी करा. 50 लाख महिला लखपती दीदी झाल्या आहेत. मोदींनी लाडक्या लखपती दीदी योजना आणली आहे. पुढच्या पाच ते सहा महिन्यात ही योजना राबवली जाईल. पुण्यात आपला महापौर बसणार आहे. पुढच्या वेळेस मी विचारणार आहे की, किती महिलांना लखपती दीदी बनवलं आणि तरच त्यांना पुढच्या वेळेस तिकीट देणार. 15 तारखेला सकाळी उठायचं, घड्याळाचा गजर लावायचा ते घड्याळ बंद करायचं. मतदान केंद्रावर जायचं कमळ पाहायचं उमेदवाराचा चेहरा पाहायचा, एक गोष्ट लक्ष ठेवायची फक्त कमळाचे बटण दाबायचं. 15 तारखेला कमळाची काळजी घेतली तर पुढची पाच वर्ष आम्ही तुमची काळजी घेतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकील नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Pralhad Joshi NTA : एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
एनटीएची सर्वात मोठी कारवाई, पेपर तयार करणाऱ्या 600 तज्ज्ञांची उचलबांगडी
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका
कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचं प्रमोशन म्हणून महाजनांना नाशिकचं पालकमंत्रीपद, भास्कर जाधवांचा टोला, तर नार्वेकरांना विधानसभेचं अध्यक्ष असल्याचं भान राहिलं नसल्याची टीका

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Embed widget